रिलायन्स जिओ सध्या सर्वाधिक वापरकर्ते असलेली देशातील टॉपवर असलेली टेलिकॉम कंपनी आहे. Jio आपल्या ग्राहकांना उत्तम बेनिफिट्ससह प्लॅन्स देण्यासाठी आधीपासून प्रसिद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दीर्घ वैधता आणि OTT सबस्क्रिप्शनसह तीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. Jio ने 3,662 रुपये, 3,226 रुपये आणि 3,225 रुपये हे प्लॅन्स कंपनीने आपल्या साइटवर गुपचूपपणे सूचीबद्ध केले आहेत. बघुयात सविस्तर माहिती.
या मालिकेत Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन 3,225 रुपयांचा आहे. जिओच्या 3,225 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, 64 kbps वर अमर्यादित डेटा मिळतो. यामध्ये अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि ZEE5 बेनिफिट्ससह 365 दिवसांची वैधता समाविष्ट आहे. एव्हढेच नाही तर, JioTV, JioCinema आणि JioCloud यांचाही या प्लॅनमध्ये समावेश आहे.
हे सुद्धा वाचा: बहुप्रतीक्षित Google Pixel 8 सिरीज अखेर टेक विश्वात लाँच, तब्बल 8,000 रुपयांच्या Discountसह खरेदी करा। Tech News
Jio ने लाँच केलेल्या आणखी एका प्लॅनची किंमत 3,226 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो, त्यानंतर 64 kbps अमर्यादित डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित 5G डेटा, दररोज 100 SMS आणि 365 दिवसांची वैधता समाविष्ट आहे. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे Sony LIV सबस्क्रिप्शनसह येईल, त्यात JioTV, JioCinema आणि JioCloud देखील समाविष्ट आहे.
हा प्लॅन या मालिकेतील सर्वात महागडा प्लॅन आहे. हा प्लॅन दररोज 2.5GB डेटा ऑफर करतो, त्यानंतर तो 64 kbps अमर्यादित आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित 5G डेटा, दररोज 100 SMS आणि 365 दिवसांची वैधता समाविष्ट आहे. त्याबरोबरच, Sony LIV आणि ZEE5 चे मोफत सबस्क्रिप्शन यामध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, JioTV, JioCinema आणि JioCloud यांचाही या प्लॅनमध्ये ऍक्सेस देण्यात येईल.