रिलायन्स Jio ने भारतातील प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 'Jio स्वातंत्र्य दिन 2022' ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी वापरकर्त्यांना दररोज अनेक GB अतिरिक्त डेटा, एक वर्षासाठी वैधता आणि 3,000 रुपयांचे अनेक फायदे देत आहे. यासोबतच Jio Disney + Hotstar मोबाईल आणि JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर एका वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. चला तर मग जाणून घेऊयात Jio च्या या खास ऑफरबद्दल सविस्तर माहिती…
Jio स्वातंत्र्य दिन 2022 ऑफर 2,999 रुपयांच्या दीर्घकालीन Jio प्रीपेड प्लॅनसह उपलब्ध आहे. या प्लॅनसह, तुम्हाला Disney+ Hotstar आणि इतर Jio ऍप्सचा ऍक्सेस मिळेल.
Jio स्वातंत्र्य दिन 2022 ऑफरचे फायदे
Jio स्वातंत्र्य दिन 2022 ऑफरसह, ग्राहकांना 365 दिवस किंवा 1 वर्षाच्या कालावधीसाठी दररोज 2.5GB डेटा मिळतो. या प्लॅनसह, तुम्हाला दररोज 100 SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ देखील मिळतो. 2.5GB डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटचा स्पीड 64Kbps पर्यंत खाली येईल.
यामध्ये, वापरकर्त्यांना 75GB अतिरिक्त डेटा, 499 रुपयांचे Disney+ Hotstar मोबाइल प्लॅन आणि JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud आणि इतर ऍप्सच्या Jio सूटमध्ये प्रवेश देखील मिळेल. पण इतकेच नाही तर, Jio इंडिपेंडन्स डे 2022 ऑफर तुम्हाला 2,250 रुपयांचे इतर फायदे देखील ऑफर करत आहे. ज्यात Ajio वर 750 रुपयांची सूट, Netmeds वर 750 रुपयांची आणि Ixigo वर 750 रुपयांची सूट आहे.
या खास Jio प्रीपेड प्लॅनशी संबंधित ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ते लगेच रिचार्ज करू शकता. यासाठी तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाइट किंवा MyJio ऍपवर जाऊन रिचार्ज करू शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.