Jio In-Flight plans : आता कॉल-SMS आणि इंटरनेटचा वापर विमानात बसूनही करता येईल

Updated on 24-Aug-2022
HIGHLIGHTS

Jio In-Flight plans ची यादी बघा

आता विमानात बसूनही इंटरनेट वापरता येईल

यासाठी JIO तीन प्लॅन्स ऑफर करत आहे

फ्लाइटमध्ये आपले फोन नेटवर्क बंद होते आणि मोबाइल कनेक्टिव्हिटी थांबते. अशावेळी फोन बंद करावा लागतो. पण आता तुम्हाला हे करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला JIO च्या अशा प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही फ्लाइटमध्ये असतानाही इंटरनेट, कॉलिंग आणि SMS वापरू शकता. हे प्लॅन्स मोफत आंतरराष्ट्रीय रोमिंगसह येतात. Jio 499 रुपये, 699 रुपये आणि 999 रुपये किंमतीचे 3 इन-फ्लाइट प्लॅन ऑफर करते. 

हे सुद्धा वाचा : Ptron Musicbot Evo साउंडबार 999 रुपयांमध्ये लाँच, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Jio In-Flight plans

499 रुपयांचा प्लॅन

1 दिवसाच्या वैधतेसह प्लॅनमध्ये 100 मिनिटे आउटगोइंग कॉल्स, 250 MB मोबाइल डेटा आणि 100 SMS  मिळतात. या पॅकसह इनकमिंग SMS मोफत आहेत, परंतु इनकमिंग कॉल्सना परवानगी नाही. मात्र, इंटरनेटचा वेग देखील प्रत्येक विमान कंपनीनुसार बदलतो, हे लक्षात ठेवा.

699 रुपयांचा प्लॅन 

100 मिनिटांच्या आउटगोइंग व्हॉइस कॉलची ऑफर देणारा प्लॅन 100 SMS सह 500MB डेटा एका दिवसाच्या वैधतेसह ऑफर करतो. या प्लॅनमध्ये इनकमिंग कॉलला परवानगी नाही, परंतु येणारे SMS विनामूल्य आहेत. 

999 रुपयांचा प्लॅन

सर्वात महाग प्लॅन इन-फ्लाइट नेटवर्क सेवेसाठी 999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 100 मिनिटे आउटगोइंग कॉल, 1GB मोबाइल डेटा आणि 100 SMS बरोबर 1 दिवसाची वैधता आहे.

जिओ इन-फ्लाइट प्लॅन्स कसे ऍक्टिव्हेट कराल :

इन-फ्लाइट प्लॅन ऍक्टिव्हेट करण्यासाठी, युजर्सना फ्लाइट 20,000 फूट आणि त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, त्यानंतर हे स्टेप्स फॉलो करा:

– एयरप्लेन मोड ऑफ करून फोन स्विच ऑन करा.

–  फोन स्वयंचलितपणे एरोमोबाइल नेटवर्कशी कनेक्ट होईल. तुमचे डिव्हाइस नेटवर्कशी कनेक्ट करण्यात सक्षम नसल्यास, फोन सेटिंग्जमधील 'कॅरिअर' ऑप्शनवर जा आणि मॅन्युअली एरोमोबाइल निवडा. तसेच, डेटा सेवा वापरण्यासाठी डेटा रोमिंग सुरु करा.

– कनेक्टिव्हिटीनंतर, वेलकमटेक्स्ट आणि प्राइसिंग इन्फॉर्मेशन मिळेल. 

– इन-फ्लाइट प्लॅनचा वापर कॉल, टेक्स्ट, ईमेल आणि इंटरनेट सर्फ करण्यासाठी केला जाऊ शकतो.

– इन-फ्लाइट कॉल करण्यासाठी, '+' डायल करा, त्यानंतर कंट्री कोड, नंतर फोन नंबर प्रविष्ट करा. उदाहरणार्थ, तुम्हाला सिंगापूरहून भारतात कॉल करायचा असल्यास, +9170188999999 डायल करा.

JIO च्या या खास प्लॅन्सचा वापर करण्यासाठी प्रवाशांना फ्लाइटमध्ये जाण्यापूर्वी या प्लॅनसह रिचार्ज करावे लागेल. रिचार्ज करण्यापूर्वी, प्रवाशांनी एअरलाइन्स/आंतरराष्ट्रीय फ्लाइटची यादी तपासली पाहिजे ज्यावर ते इन-फ्लाइट सेवा वापरू शकतात. प्लॅनचे फायदे फक्त JIOच्या पार्टनर एअरलाइन्स आणि डेस्टिनेशनवर लागू आहेत.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :