Jio युजर्ससाठी आकर्षक New Year Gift! ‘या’ प्लॅनमध्ये मिळतेय 24 दिवसांची अतिरिक्त वैधता। Tech News
Jio च्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन वर्षाची खास भेट
हॅपी न्यू इयर 2024 ऑफर अंतर्गत प्लॅनमध्ये लॉन्ग टर्म प्लॅनमध्ये एक्सट्रा वैधता
पात्र वापरकर्ते यामध्ये अमर्यादित ट्रू 5G डेटाचा लाभ देखील घेऊ शकतात.
2024 हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. रिलायन्स Jio आपल्या प्रीपेड ग्राहकांना नवीन वर्षाची खास भेट ऑफर करत आहे. नवीन वर्षाच्या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या एका वार्षिक प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 24 दिवसांची अतिरिक्त वैधता व्हाउचर देत आहे. चला तर मग फार वेळ न घालवता जाणून घेऊयात प्लॅनची किंमत आणि सर्व फायदे-
Jio चा 2,999 रुपयांचा प्लॅन
Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता दिली जाते. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा मिळेल. या व्यतिरिक्त, हा प्लॅन JioTV, JioCinema आणि JioCloud चे ऍक्सेस देखील देतो.
वर सांगितल्याप्रमाणे, हॅपी न्यू इयर 2024 ऑफर अंतर्गत, कंपनी या प्लॅनच्या एकूण वैधतेमध्ये अतिरिक्त 24 दिवस समाविष्ट करत आहेत. पात्र वापरकर्ते यामध्ये अमर्यादित ट्रू 5G डेटाचा लाभ देखील घेऊ शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन 64Kbps होईल.
JIO चा सर्वात महागडा प्लॅन
सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये JIO सर्वात महागडा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची किंमत 4,498 रुपये इतकी आहे. हा प्लॅनदेखील संपूर्ण एका वर्षाच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला 5G स्पीडसह मिळेल. कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS दिले जातात. एवढेच नाही, तर प्लॅनमध्ये 14 OTT Apps चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile