ग्रेट Jio प्लॅन : 230 रुपयांमध्ये दररोज 2.5GB डेटा, कॉलिंगसह मिळेल Disney + Hotstar सबस्क्रिप्शन

Updated on 19-Jul-2022
HIGHLIGHTS

एका वर्षाच्या वैधतेसह JIOचा जबरदस्त प्लॅन

प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा मिळेल

त्याबरोबरच, Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन उपलब्ध

रिलायन्स Jio कडे प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत परवडणाऱ्या अनेक प्रीपेड प्लॅन आहेत. कंपनीकडे 20 दिवसांपासून ते 1 वर्षाच्या वैधतेसह प्लॅन्सआहेत. तुम्हाला 259 रुपयांमध्ये दररोज 1.5 GB डेटासह एक महिन्याचा प्लॅन मिळतो. पण आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत एका महिन्यासाठी 230 रुपये आहे. याबरोबर, Disney + Hotstar देखील दररोज 2.5 GB डेटासह उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा : Flipkart Big Savings Day sale : फ्लिपकार्टची सर्वात मोठी सेल 'या' दिवशीपासून होणार सुरु, पहा सर्वोत्तम डिल्स

Jio चा लॉन्ग टर्म प्लॅन

जरी रिलायन्स Jio चे बरेच लॉन्ग टर्म प्लॅन आहेत, परंतु आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत त्याची किंमत 2,999 रुपये आहे. हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच 12 महिन्यांनुसार एका महिन्याचा खर्च 230 रुपये आहे.

 Jio च्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5 GB डेटा दिला जातो. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला एकूण 912.5 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS देखील दररोज दिले जातात.

वापरकर्त्यांना Jio कडून मोफत Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल, ज्याची किंमत प्रति वर्ष 499 रुपये आहे. याशिवाय वापरकर्त्यांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud ऍक्सेस देखील मिळेल. एकंदरीत, दर महिन्याला रिचार्ज करण्याच्या तुलनेत हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :