नवीन रिपोर्ट नुसार सर्विस नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या आसपास अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल.
रिलायंस जियो आपला लेटेस्ट प्रोडक्ट सेगमेंट आणण्यासाठी तयार आहे, कंपनी 15 ऑगस्टला आपली जियो Gigafiber ब्रॉडबँड होम इन्टरनेट सर्विस सादर करेल. नवीन रिपोर्ट नुसार, या सर्विसची किंमत प्रति माह 500 रूपये असेल, जी स्वस्तात चांगली हाई-स्पीड इन्टरनेट देईल. त्याचबरोबर यात इन्टरनेट वर आधारित TV सर्विसेज चा समावेश करण्यात आला आहे, याचा अर्थ असा की यूजर्स इन्टरनेट चा वापर करून TV वर रेगुलर चॅनल आणि प्रोग्राम बघता येतील.
15 ऑगस्टला रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर यूजर्स प्लान्सला सब्सक्राइब करण्यासाठी आपले नाव नोंदवू शकतात. Economic Times च्या रिपोर्ट वरून समजते की ही सेवा नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या आसपास अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल. क्षेत्रीय उपलब्धता यूजर्स च्या रजिस्ट्रेशन वर आधारित असेल.
वायरलेस जियो प्लान्स आणि सर्विसेज सोबत Jio GigaFiber चांगल्या किंमतीत, हाई स्पीड इन्टरनेट आणि हेवी यूसेज प्लान्स सह 500 रुपयांच्या बेसिक किंमतीत घर आणि ऑफिसेज साठी ही सर्विस देण्यात येईल.
इन्टरनेट वर आधारित TV सर्विस सोबत इन्टरनेट चे कॉम्बिनेशन कंपनी ची अजून एक खासियत आहे. सध्या यूजर्सना इन्टरनेट आणि केबल TV साठी वेगवेगळे पैसे द्यावे लागतात. दोन्ही सर्विसेज एका सिंगल प्लान मध्ये आणून त्यांची किंमत कमी करता येईल.