JIOचा 599 रुपयांचा प्लॅन, मिळेल तब्बल 14 OTT ऍप्सचे फ्री सब्स्क्रिप्शन

JIOचा 599 रुपयांचा प्लॅन, मिळेल तब्बल 14 OTT ऍप्सचे फ्री सब्स्क्रिप्शन
HIGHLIGHTS

JIO FIBERचा 599 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये संपूर्ण 30 दिवसांची वैधता दिली जाते.

मनोरंजनासाठी 500 पेक्षा जास्त चॅनेल ऑन डिमांड मिळतील.

तुम्हाला जर तुमच्या ऑफिसच्या कामासाठी किंवा फक्त तुमच्या मनोरंजनासाठी जास्त डेटाची गरज आहे. तर, आमच्याकडे तुमच्यासाठी एक उत्तम सोय आहे. घरून काम करताना इंटरनेटमध्ये जास्त अडचणी येऊ नयेत म्हणून आपण घरी JIO FIBERची सेवा घेऊ शकता. JIO FIBERकडे 599 रुपयांचा एक आकर्षक प्लॅन आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या प्लॅनचे सविस्तर तपशील बघुयात- 

 JIO FIBERचा 599 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनमध्ये तुम्हाला अर्थातच अमर्यादित डेटा मिळणार आहे. यामध्ये डेली डेटा लिमिट नसल्यामुळे डेटा संपण्याचा काही त्रास उरणार नाही. या प्लॅनमध्ये संपूर्ण 30 दिवसांची वैधता दिली जाते. दरम्यान, इंटरनेट स्पीड 30Mbps राहील. याबरोरच, तुम्हाला अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. 

विशेष म्हणजे यामध्ये ग्राहकांच्या मनोरंजनासाठी 500 पेक्षा जास्त चॅनेल ऑन डिमांड मिळतील. तसेच, तब्बल 14 OTT ऍप्सचे फ्री सब्स्क्रिप्शन देखील ग्राहकांना मिळणार आहे. Disney plus hotstar, SonyLIV, ZEE5, Voot select, Voot kids, Sun next, Hoichoi, Discovery+, Universal+, ALT balaji, Eros now, Lionsgate play, ShemarooMe या OTT ऍप्सचे सब्स्क्रिप्शन उपलब्ध आहे. 

याच श्रेणीत JIO FIBERचा आणखी एक प्लॅन 

या श्रेणीमध्ये JIO FIBER 499 रुपयांचा एक प्लॅनदेखील आहे. या प्लॅनमध्ये देखील संपूर्ण  30 दिवसांची वैधता दिली जाते. दरम्यान, इंटरनेट स्पीड 30Mbps राहील. विशेष म्हणजे यामध्ये ग्राहकांच्या मनोरंजनासाठी 400 पेक्षा जास्त चॅनेल ऑन डिमांड मिळतील. त्याबरोबरच, सात OTT ऍप्सचे सब्स्क्रिप्शन यामध्ये मिळणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo