digit zero1 awards

बिलाचे टेन्शन नाही! Jio Fiber देत आहे मोफत इंटरनेट आणि कॉलिंग, कोणतीही अट नाही

बिलाचे टेन्शन नाही! Jio Fiber देत आहे मोफत इंटरनेट आणि कॉलिंग, कोणतीही अट नाही
HIGHLIGHTS

Jio Fiber ची 30 दिवसांची फ्री ट्रायल

यामध्ये तुमच्या मनोरंजनाची देखील संपूर्ण सोय करण्यात आलेली आहे.

कनेक्शन करण्यापूर्वी वन टाइम चार्ज घेतला जातो, जो नंतर परत दिला जातो.

तुम्ही Jio Fiber इन्स्टॉल करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. आम्ही तुम्हाला एक नवीन प्लॅन सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने, आपण इंटरनेट वापरू शकता. एवढेच नाही, आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की तुम्ही फास्ट इंटरनेटचा आनंद कसा घेऊ शकता आणि त्यानंतरही बिल भरण्याची गरज नाही. होय, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कस शक्य आहे ? बघुयात उत्तर… 

हे सुद्धा वाचा : बेस्ट डिल ! फक्त 18,999 रुपयांमध्ये खरेदी करा Oppo F21 Pro, मूळ किंमत आहे खूप जास्त

JIO FIBER TRAIL OFFER 

Jio Fiberचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्हाला 30 दिवसांची मोफत चाचणी दिली जाते. तुम्हाला कोणत्याही अटींशिवाय 30 दिवसांची मोफत चाचणी मिळत आहे. ही चाचणी Jio द्वारे अशा वापरकर्त्यांना दिली जात आहे ज्यांना सेवा खरेदी करण्यापूर्वी त्याची चाचणी घ्यायची आहे. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, यादरम्यान सिमेट्रिक स्पीडसह 150 mbps अनलिमिटेड इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे.

यामध्ये तुमच्या मनोरंजनाची देखील संपूर्ण सोय करण्यात आलेली आहे. यामुळेच या प्लॅनमध्ये 14 पेड OTT  ऍप्सची सुविधा देण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला या कालावधीत सेवा आवडली नाही तर ती मागे घेतली जाईल. कनेक्शन करण्यापूर्वी वन टाइम चार्ज घेतला जातो, जो नंतर परत दिला जातो.

Jio Fiber इन्स्टॉल करण्यापूर्वी, 1,500 रुपये इंटरनेट चार्ज घेतला जातो, जो आवडला नाही तर रिटर्न केला जातो. तर 2500 रुपये वन टाइम चार्ज इंटरनेट + OTT विनामूल्य चाचणीसह घेतले जाते. हे देखील नंतर परत केले जाते. म्हणजेच, न आवडल्यास, तुम्हाला हे पूर्ण शुल्क परत केले जाईल. खरं तर, JIO ने आपले वापरकर्ते वाढवण्याच्या उद्देशाने ही ट्रायल ऑफर सुरू केली आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo