एयरटेल ने आपल्या Rs. 93 वाल्या प्लॅन मध्ये केला बदल

Updated on 12-Feb-2018
HIGHLIGHTS

आता Rs. 93 च्या प्लॅन मध्ये 1GB 4G/3G डेटा सह अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्स सोबत 28 दिवसांची वैधता मिळते. आधी या ऑफर मध्ये हे फायदे फक्त 10 दिवसांसाठी मिळत होते.

एयरटेल ने आपल्या Rs. 93 वाल्या प्रीपेड प्लॅन मध्ये बदल करत आता नव्याने हा प्लॅन सादर केला आहे. आता या प्लॅन अंतर्गत जास्त दिवसांच्या वैधते सोबत 1GB 4G/3G डेटा मिळत आहे.
या ऑफर मुळे यूजर ला 1GB 4G/3G डेटा सोबतच अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्स सोबत 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. पण जर तुम्ही एक एयरटेल ग्राहक आहात आणि या प्लॅन ने रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर आधी माहिती करून घ्या कि हा प्लॅन तुमच्या सर्कल मध्ये उपलब्ध आहे की नाही ते. एयरटेल ने आपल्या Rs. 93 वाल्या प्लॅन ला मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये सादर केले होते. आधी हा प्लॅन फक्त 10 दिवसांच्या वैधते सह येत होता.
एयरटेल च्या या Rs. 93 वाल्या प्लॅन ची टक्कर रिलायंस जियो च्या Rs. 98 वाल्या प्लॅन सोबत आहे. जियो च्या या प्लॅन मध्ये आता 2GB 4G डेटा, फ्री लोकल आणि STD कॉल्स सह 300 SMS आणि जियो अॅप्स चा अॅक्सेस पण मिळतो.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :