मागील महिन्यात आम्ही अशी बातमी दिली होती की, लवकरच रिलायन्स जिओची सेवा सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. आणि आता ही बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. जसे की आपल्या सर्वांना माहितच असेल की, खूप काळाआधी देशात अनेक रिटलर्सच्या माध्यमातून रिलायन्स जिओच्या 4G सिमला विकले गेले होते. आणि तेव्हा हे सिम आपल्याला कोणत्याही निमंत्रणाशिवाय Lyf स्मार्टफोन्ससह मिळत होते.
आता रिलायन्सने आपली Ji.com वेबसाइट अधिकृतरित्या सुरु केली आहे. ह्या वेबसाइटनुसार, आता रिलायन्स जिओची सेवा सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. ह्याआधी मिळालेल्या बातमीनुसार, ही सेवा केवळ रिलायन्समध्ये काम करणा-या लोकांसाठीच होती, पण आता सर्वजण ही सेवा वापरु शकतात. जर आपण ह्या वेबसाइटवर जाऊन आपली पसंती दाखवली तर कंपनी लवकरच आपल्याशी संपर्क करेल.
जर तुम्ही ह्याची अधिकृत वेबसाइट बघितली तर तुम्हाला माय जिओ अकाउंट्सची सविस्तर माहिती दिसेल. जसे की आपण रिलायन्स जिओचे सिम आणि LYF चा स्मार्टफोन घेता, तर आपल्याला ह्या वेबसाइटवर जाऊन आपली जिओ ID बनवल्यानंतरच आपल्याला आपले अकाउंट डिटेल्स दिसतील.
जर आपल्या सिमचा कालावधी संपला, तर आपल्याला ह्या वेबसाइटच्या माध्यमातून ह्याला रिचार्ज करावे लागेल. येथे आपण वेगवेगळे प्लान्ससुद्धा पाहू शकता. जर तुम्हाला रिलायन्स जिओची सिम हवी असेल, तर तुम्हाला एक LYF हँडसेट खरेदी करावा लागेल, मात्र भविष्यात कंपनी ही गोष्ट बदलू शकते. मात्र सध्यातरी ह्याविषयी आपण केवळ अंदाज लावू शकतो.
जर तुम्ही LYF चा एखादा स्वस्त स्मार्टफोन जसे की, LYF flame 1 खरेदी करता, तर आपल्याला ३ महिन्यासाठी अनलिमिटेड डाटा, कॉल्स, एसएमएस आणि जिओ अॅपचे एक्सेस मिळते.
हेदेखील वाचा – लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?
हेदेखील वाचा – भारतात लाँच होण्याआधीच सेलसाठी उपलब्ध झाला LeEco Le 2 स्मार्टफोन