दिवाळी ऑफरअंतगर्त Jio आपल्या लॉन्ग टर्म प्लॅनमध्ये एक्सट्रा व्हॅलिडिटी ऑफर करत आहे.
या प्लॅनमध्ये यूजर्सना 23 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल.
विशेष म्हणजे तुम्हाला यासह 5G कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे.
रिलायन्स Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. सध्या सणासुदीच्या हंगामात सर्व कंपन्या आपल्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स देत असताना, Jio देखील या यादीत सामील झाली आहे. होय, दिवाळीच्या निमित्ताने Jio आपल्या चाहत्यांना विविध प्रकारच्या ऑफर देत आहे. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक रोमांचक दिवाळी ऑफर सादर केली आहे.
Jio Diwali ऑफर
दिवाळी ऑफरअंतगर्त Jio आपल्या लॉन्ग टर्म प्लॅनमध्ये एक्सट्रा व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये जवळपास एक पाऊण महिन्याची अतिरिक्त वैधता मिळणार आहे. जर तुम्ही दीर्घकाळ वैधतेसह येणार प्लॅन शोधत असाल तर तुम्ही ही दिवाळी ऑफर नक्की चेक करा.
2,999 रुपयांचा प्लॅन
Jio Diwali ऑफर अंतर्गत Jio ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या यादीत 2,999 रुपयांचा प्लॅन जोडला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 23 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल. या प्लॅनसह रिचार्ज केल्यास संपूर्ण वर्षभर वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून तुमची सुटका तर होतेच. तर, वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता ऑफर केली जाते. तुम्हाला दररोज 2.5GB डेटा वापरायला मिळेल. तुम्ही वर्षभर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. यासोबतच कंपनी दररोज 100SMS देखील देते.
अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मिळेल. विशेष म्हणजे तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध असलेल्या भागात राहिल्यास, पात्र सदस्यांना अमर्यादित 5G डेटाचा ऍक्सेस देखील मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.