Diwali Dhamaka Offer: ‘या’ दोन Jio रिचार्ज प्लॅन्सवर मिळतील हजारो रुपयांचे फायदे, अप्रतिम ऑफर्सदेखील उपलब्ध
Jio ने दिवाळीनिमित्त 'Diwali Dhamaka Offer' जाहीर केली आहे.
Jio ने 899 रुपये आणि 3,599 रुपयांच्या प्लॅनवर उत्तम ऑफर्स जाहीर केले आहेत.
Diwali Dhamaka ऑफर्स अंतर्गत मिळणारी कूपन्स खरेदी, प्रवास आणि बाहेर खाण्यासाठी वापरली जाऊ शकतात.
Diwali Dhamaka Offer: दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर जाहीर केली आहे. खरं तर, कंपनीने 899 रुपये आणि 3,599 रुपयांच्या प्लॅनवर उत्तम ऑफर्स जाहीर केले आहेत. Jio ने नव्या ऑफरला ‘Diwali Dhamaka Offer’ ऑफर म्हटले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ग्राहकांना दोन्ही प्लॅनवर 3,350 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कूपन दिले जातील.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Diwali Dhamaka ऑफर्स अंतर्गत मिळणारी ही कूपन्स खरेदी, प्रवास आणि बाहेर खाण्यासाठी वापरली जाऊ शकतात. लक्षात घ्या की. ही कूपन EaseMyTrip, AJio आणि Swiggy ची असतील. जाणून घेऊयात या ऑफरबद्दल संपूर्ण तपशील-
Jio ची Diwali Dhamaka Offer
Jio ने म्हटले की, 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ग्राहकांनी 899 रुपयांचा तिमाही रिचार्ज प्लॅन आणि 3,599 रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन निवडल्यास त्यांना कुपन्स दिले जाणार आहेत. ग्राहक Jio चा हा प्लॅन रिचार्ज करताच ऑफरअंतर्गत मिळणारे कूपन MyJio ॲपमध्ये दिसू लागतील. दरम्यान, कूपन कोड कॉपी केले जाऊ शकतात आणि Jio च्या भागीदार प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकतात. जिओनुसार, EaseMyTrip वर ग्राहकांना फ्लाइट आणि हॉटेल्सवर 3,000 रुपयांची सूट मिळेल. त्याबरोबरच, Swiggy वर जेवण ऑर्डर केल्यावर तुम्हाला 150 रुपये सूट मिळेल. त्याशिवाय, AJio वर 200 रुपयांची सूट देखील मिळू शकते.
Jio चा 899 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB 5G डेटासह 20GB अतिरिक्त डेटा मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS चा लाभ दिला जात आहे. लक्षात घ्या की, हा प्लॅन संपूर्ण तीन महिन्याच्या म्हणजेच 90 दिवसांच्या वैधतेसह येतो.
Jio चा 3599 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 3,599 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, इंटरनेट वापरासाठी या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स, दररोज 100SMS उपलब्ध आहेत. प्लॅनमधील इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात Jio ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile