टेलिकॉम कंपन्या अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करतात, ज्यात दररोज 1 GB, 1.5 GB आणि 2 GB पर्यंत डेटा मिळतो. पण इंटरनेटच्या वाढत्या गरजेमुळे रोजचा डेटा संपायला वेळ लागत नाही. कधीकधी आपण तातडीचे काम करत असतो आणि डेटा संपतो. अशा स्थितीत महत्त्वाचे काम कसे उरकायचे, हे अवघड होते. आज आम्ही तुम्हाला JIO च्या माफक किमतीच्या डेटा प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
हे सुद्धा वाचा : Redmi Note 11SE 26 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होण्यासाठी सज्ज, पहा डिटेल्स
रिलायन्स JIO कडे सध्या एकूण चार डेटा व्हाउचर आहेत. 4G डेटा व्हाउचर डेटा ऍड-ऑन प्लॅनपेक्षा वेगळे आहेत. जेव्हा जेव्हा तुमचा सामान्य प्रीपेड प्लॅन संपेल तेव्हा डेटा व्हाउचर देखील संपेल. चला व्हाउचरवर एक नजर टाकूयात…
Jio चा 15 रुपयांचा व्हाउचर :
Reliance Jio चा 15 रुपयांचा 4G डेटा व्हाउचर सध्या बाजारात उपलब्ध सर्वात परवडणारा 4G डेटा व्हाउचर आहे. या डेटा व्हाउचरसह, वापरकर्त्यांना 1GB डेटा मिळतो.
Jio चा 25 रुपयांचा व्हाउचर :
Jio चा 25 रुपयांचा 4G डेटा व्हाउचर 2GB डेटासह येतो. यात तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल.
Jio चा 61 रुपयांचा व्हाउचर :
61 रुपयांच्या व्हाउचरसह Jio 6GB डेटा ऑफर करतो.
Jio चा 121 रुपयांचा व्हाउचर :
रिलायन्स JIO चे हे सर्वात महागडे 4G डेटा व्हाउचर आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 12GB हाय-स्पीड डेटा मिळतो.