रिलायन्स Jio भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. Jio च्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त ते महागडे प्लॅन्स आहेत. या सर्व प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि SMS दिले जात आहेत. एवढेच नाही तर, मनोरंजनासाठी OTT ॲप्स आणि प्रीमियम ॲप्सची सदस्यता देखील मिळते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दीर्घ वैधतेसह दररोज 2GB डेटा मिळेल. जाणून घेऊयात किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
Jio चा हा प्लॅन संपूर्ण 72 दिवसांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच यात एकूण 20GB अतिरिक्त बोनस डेटा मिळतो. याशिवाय, प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि दररोज 100SMS दिले जातात. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Cloud चे ॲक्सेस मोफत मिळणार आहे.
रिलायन्स Jio या प्रीपेड प्लॅनमध्ये संपूर्ण 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. त्यानुसार, तुम्हाला संपूर्ण महिन्यात एकूण 168GB डेटा मिळणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळेल. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये Jio TV, Cinema आणि Cloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.
Jio च्या 949 रुपयांच्या प्लॅनची वैधता एकूण 84 दिवसांची म्हणजेच जवळपास तीन महिन्यांची आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100SMS ची सुविधा मिळेल. एवढेच नाही तर, यामध्ये Jio TV, Cinema आणि Cloud वर देखील प्रवेश उपलब्ध आहे. त्याबरोबरच, जर तुम्हाला वेब सीरीज आणि चित्रपट पाहण्याची आवड असेल तर, हा प्लॅन तुमच्यासाठी खास आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये Disney+Hotstar सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी मोफत दिले जात आहे.