तुम्हाला JIOच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्स मिळतात. जर तुम्हाला दीर्घकालीन कॉलिंग प्लॅन हवा असेल तर तुमच्याकडे खूप कमी पर्याय आहेत. जे पर्याय आहेत त्यांच्यासाठीही सुमारे तीन हजार रुपये खर्च करावे लागतात. पण JIO कडे याबाबतीत एक स्वस्त प्लॅन आहे. चला जाणून घेऊयात या प्लॅनबद्दल सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : Redmi चा हा स्वस्त फोन लवकरच भारतात होणार लाँच, बघा अपेक्षित किंमत
या Jio प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 336 दिवसांची वैधता मिळेल. हा प्लॅन 24GB डेटासह येतो, जो संपूर्ण वैधतेसाठी आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला 64Kbps स्पीडने इंटरनेट मिळत राहील. त्याबरोबरच, तुम्ही डेटा व्हाउचर देखील खरेदी करू शकता.
या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबत 3600 SMS चाही फायदा मिळतो. एवढेच नाही तर वापरकर्ते 5G डेटा वापरण्यासही पात्र असतील. तुमच्या शहरात Jio 5G सेवा असल्यास आणि तुमच्याकडे 5G हँडसेट असल्यास, तुम्ही Jio 5G सेवा वापरण्यास सक्षम असाल.
मात्र, यासाठी तुमच्याकडे जिओ वेलकम ऑफर असणे आवश्यक आहे. यामध्ये यूजर्सना Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चा ऍक्सेस देखील मिळेल. Jio वेलकम ऑफर कंपनीने निवडक युजर्सना दिली आहे आणि ती इनव्हाईट बेस्ड ऑफर आहे.
याशिवाय जिओच्या स्वस्त प्लॅनच्या यादीत 395 आणि 155 रुपयांचे रिचार्ज देखील आहे. या दोन्हीमध्ये वापरकर्त्यांना अनुक्रमे 84 दिवस आणि 28 दिवसांची वैधता मिळेल. 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 6GB डेटा मिळेल. तर, 155 रुपयांमध्ये कंपनी पूर्ण वैधतेसाठी 2GB डेटा देत आहे.