digit zero1 awards

Jio चे जबरदस्त प्लॅन, दररोज 2GB हाय-स्पीड डेटासह मिळतील अनेक बेनिफिट्स…

Jio चे जबरदस्त प्लॅन, दररोज 2GB हाय-स्पीड डेटासह मिळतील अनेक बेनिफिट्स…
HIGHLIGHTS

या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा आणि प्रीमियम ऍप्सची सदस्यता दिली जाते.

Jio च्या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.

Vodafone Idea त्याच्या प्रीपेड पॅकमध्ये 5GB अतिरिक्त डेटा

Reliance Jio कडे प्रत्येक रेंजमध्ये प्रीपेड प्लॅन आणले आहेत. या सर्वांमध्ये युजर्सच्या गरजेनुसार डेटासह अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे. याशिवाय अनेक रिचार्ज पॅकसह प्रीमियम ऍप्सची सदस्यता देखील उपलब्ध आहे. मात्र, मोठ्या संख्येने प्रीपेड पॅक उपलब्ध असल्यामुळे योग्य प्लॅन्स निवडणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, जाणून घेऊयात असे काही प्लॅन्स, ज्यात दररोज 2GB डेटाचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy S23 Ultra vs iPhone 14 Pro Max: Apple आणि Samsung मध्ये सर्वोत्कृष्ट कोण?

Jio चा 299 रुपयांचा प्लॅन

Jio या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटासह 100SMS देते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय प्लॅनसोबत जिओ टीव्ही, सिनेमा, क्लाउड आणि सिक्युरिटीचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. तर, हा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Jioचा 533 रुपयांचा प्लॅन

Jioच्या या प्रीपेड प्लॅनची मुदत 56 दिवस आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2GB डेटा आणि 100SMS मिळतात. याशिवाय प्लॅनसोबत जिओ टीव्ही, सिनेमा, क्लाउड आणि सिक्युरिटीचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

Vi चा 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

याच किमतीत Vodafone Idea चा 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्रीपेड प्लॅनची वैधता एक महिन्याची आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा आणि 100SMS दिला जातो. याशिवाय, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि संपूर्ण रात्र डेटा डिलाईट्स सारखे फायदे दिले जातात. इतकेच नाही तर यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि 5 GB अतिरिक्त डेटाही उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo