टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio वापरकर्त्यांना अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक सेगमेंटमध्ये सर्वोत्तम फायदे देण्यारे प्लॅन्स आहे. जर तुम्ही अतिशय स्वस्त प्लॅन्स देण्यात देखील जिओ पुढे आहे. 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत कंपनीकडे काही उत्तम प्लॅन्स आहेत. या प्लॅन्समध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री SMS सोबत भरपूर डेटा देखील देत आहे. याशिवाय तुम्हाला या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदेही मिळतील.
कंपनीचा हा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1.5 GB नुसार एकूण 21 GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये, तुम्हाला संपूर्ण वैधता कालावधीसाठी 300 मोफत SMS मिळतील. या प्लॅनमध्ये, तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकता. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio ऍप्सची मोफत सदस्यता देखील मिळेल.
हे सुद्धा वाचा : भारीच की! Realmeचा स्वस्त स्मार्टफोन, मिळेल फुल चार्ज केल्यावर 36 दिवस टिकणारी बॅटरी आणि 1TB पर्यंत स्टोरेज
जिओचा हा प्लॅन 20 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1 GB नुसार एकूण 20 GB डेटा देते. इतर प्लॅन्सप्रमाणे, यामध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. दररोज 100 मोफत SMS देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio ऍप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही मिळेल.
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधता मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1 GB डेटा देत आहे. त्यानुसार, जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 24 GB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत SMS आणि अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. तुम्ही या प्लॅनसह रिचार्ज केल्यास, तुम्हाला Jio ऍप्सचे फ्री ऍक्सेस देखील मिळेल.
23 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB नुसार एकूण 34.5 GB डेटा ऑफर केला जात आहे. दररोज 100 मोफत SMS सह या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनमध्येही कंपनी ग्राहकांना जिओ ऍप्सचे फ्री ऍक्सेस देत आहे.