Jio recharge plan : 999 रुपयांमध्ये अमर्यादित कॉल ‘700GB पर्यंत’ डेटा, मोफत Netflix, प्राइम व्हिडिओ आणि Hotstar
Jio चा 999 रुपयांचा प्लॅन
प्लॅनमध्ये मिळेल एकूण 700 GB डेटा
OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शनदेखील उपलब्ध
पोस्टपेड प्लस सेवेअंतर्गत रिलायन्स jioचे एकूण 5 प्लॅन आहेत. कंपनी 399 रुपयांपासून 1,499 रुपयांपर्यंत पोस्टपेड प्लस प्लॅन ऑफर करते. 999 रुपयांच्या Jio प्लॅनमध्ये 200 GB हायस्पीड डेटा उपलब्ध आहे. याशिवाय 500GB डेटा रोलओव्हरच्या सुविधाही आहेत. जिओच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : Realme Buds Air 3 Neo भारतात लाँच, 30 तासांच्या बॅटरीसह मिळेल दमदार साउंड
999 रुपये रिलायन्स Jio पोस्टपेड प्लस प्लॅन
जिओच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची वैधता एक बिल सायकल म्हणजेच २८ दिवस आहे. या पोस्टपेड प्लॅनमध्ये एकूण 200 GB डेटा उपलब्ध आहे. हा डेटा संपल्यानंतर इंटरनेट वापरण्यासाठी 10 रुपये प्रति GB शुल्क भरावे लागेल.
रिलायन्स जिओच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये 500 GB डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, जर तुमचा 200 GB डेटा महिन्यात पूर्णपणे खर्च झाला नाही, तर तो डेटा पुढील महिन्यात तुमच्याकडे जमा होईल.
जिओ पोस्टपेड प्लस सेवेच्या या प्लॅनमध्ये नियमित सिम कार्ड व्यतिरिक्त 3 अतिरिक्त सिम कार्ड देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग सुविधा उपलब्ध आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS मिळतात.
OTT सबस्क्रिप्शनबद्दल बोलायचे झाले तर, Jio चा हा पोस्टपेड प्लॅन लोकप्रिय ऍपचे फ्री सब्सक्रिप्शन देतो. प्लॅनमध्ये ग्राहकांना Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar, JioTV, JioSecurity आणि Jio Cloud चे मोफत सदस्यत्व मिळते. या प्लॅनमधील प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी वैध आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, Jio चा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन घेतल्यावर JioPrime साठी 99 रुपये द्यावे लागतील.
याशिवाय Jio कडे 799 आणि 599 रुपयांचे पोस्टपेड प्लॅन देखील आहेत. जे अनुक्रमे 150 आणि 100 GB डेटा ऑफर करतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल, SMS सुविधा उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये नियमित सिमकार्ड व्यतिरिक्त अतिरिक्त सिम कार्ड देखील दिले जातात.
रिलायन्स जिओ पोस्टपेड प्लस प्लॅनमध्ये 1,499 आणि 399 रुपयांचे प्लॅन देखील ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये अनुक्रमे 300 GB आणि 75 GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध आहे. मात्र यामध्ये कोणतेही अतिरिक्त सिम कार्ड दिलेले नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile