Jio Best 5G Plan: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने दोन वर्षांपूर्वी 5G नेटवर्क लाँच केले. यासह कंपनीने वापरकर्त्यांना एक नवीन डिजिटल अनुभव दिला आहे. लक्षात घ्या की, आत्तापर्यंत Jio ने आपल्या 5G सर्व्हिसचा देशभरात अतिशय वेगाने विस्तार केला आहे आणि अनेक उत्कृष्ट 5G प्लॅन्स देखील सादर केले आहेत. विशेषतः हे प्लॅन सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहेत.
या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या बेस्ट 5G प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, Jio स्वतः या प्लॅन्सना सर्वोत्कृष्ट सांगत आहे. खरं तर, Jio ने सर्वोत्कृष्ट 5G प्लॅनची श्रेणी तयार केली आहे. त्यापैकी दररोज 2GB डेटासह दोन सर्वोत्तम रिचार्ज प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कमी बजेटमध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट 5G प्लॅन हवा असेल, तर जिओचा 349 रुपयांचा प्लॅन सर्वोत्तम आहे. हा प्लॅन जवळपास एक महिना म्हणजेच 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. तसेच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, दररोज 100SMS आणि काही जिओ ॲप्सची सुविधा उपलब्ध आहे. रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
Jio च्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB 5G डेटा दिला जात आहे. त्याबरोबरच, ग्राहकांना 20GB अतिरिक्त डेटा दिला जाईल. तसेच, मोफत डेटा मर्यादित कालावधीसाठी दिला जात आहे. याशिवाय, हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS चा लाभ दिला जात आहे. लक्षात घ्या की, हा प्लॅन दीर्घकाळ वैधतेसह येणारा प्लॅन आहे. हा प्लॅन तुम्हाला संपूर्ण तीन महिन्यांच्या म्हणजेच 90 दिवसांच्या वैधतेसह मिळेल.
प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio कडे 3,599 रुपये आणि 3,999 रुपयांचे वार्षिक प्लॅन्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला अप्रतिम बेनिफिट्स मिळतील. जसे की, यात तुम्हाला अमर्यादित कॉल, दररोज 2.5GB डेटा आणि दररोज 100 SMS ची सुविधा मिळणार आहे. 3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये FanCode चे सदस्यत्व देखील समाविष्ट आहे.