Jio चा सर्वात आकर्षक वार्षिक रिचार्ज प्लॅन अमर्यादित बेनिफिट्ससह येतो.
प्लॅनमध्ये डेटा वापरासाठी दररोज 2GB डेटा मिळणार आहे.
हा रिचार्ज प्लॅन Prime Video मोबाइल एडिशन आणि इतर ऍप्सच्या ऍक्सेससह येतो.
रिलायन्स Jio भारतातील सर्वात आघाडीचे टेलिकॉम दिग्गज आहेत. कंपनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी वेगवेगळ्या गरजांनुसार सतत नवीन प्लॅन्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये सादर करत असते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या सर्वात आकर्षक वार्षिक प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला भरपूर डेटासह OTT बेनिफिट्सदेखील मिळतील. बघुयात सविस्तर माहिती-
Jio च्या या प्लॅनची किंमत 3227 रुपये आहे. या प्लॅनसाह पात्र वापरकर्ते अमर्यादित ट्रू 5G चा लाभ देखील घेऊ शकतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता वार्षिक प्लॅनबद्दल सविस्तर माहिती बघुयात:
JIO चा 3,227 रुपयांचा प्लॅन
JIO च्या 3227 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण 365 दिवसांची वैधता मिळते. यासह तुम्हाला डेटा वापरासाठी दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 730GB डेटा मिळणार आहे. प्लॅनमधील उपलब्ध दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, 5G पात्र नसलेल्या वापरकर्त्यांसाठी वेग कमी होऊन 64 kbps होईल. तर, प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100SMS देखील उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. होय, सबस्क्रिप्शनबद्दल बोलायचे झाले तर, हा रिचार्ज प्लॅन Prime Video मोबाइल एडिशन, JIO टीव्ही, JIO सिनेमा आणि JIO क्लाउडच्या फायद्यांसह येतो. अशाप्रकारे या प्लॅनमध्ये JIO ऍप्सचा लाभ घेता येणार आहे.
मात्र, लक्षात घ्या की, या प्लॅनसह Jio Cinema Premium मध्ये प्रवेश उपलब्ध नाही. तुम्ही हा प्लॅन अधिकृत Jio वेबसाइट, MyJio App किंवा इतर आघाडीच्या ऑनलाइन चॅनेलवरून ऍक्टिव्ह करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी 3178 रुपये, 3225 रुपये, 3226 रुपये आणि 4498 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका वर्षाच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा ऑफर करतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.