अलीकडेच भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या AIRTEL, JIO आणि VI ने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. Jio आणि Airtel या दोन्ही दूरसंचार कंपन्या Unlimited 5G इंटरनेट डेटासह येतात. सध्या युजर्सना सुपर फास्ट 5G शी जोडणे ही प्रत्येकाची गरज आहे. सध्या देशात Jio आणि Airtel द्वारे 5G इंटरनेट पुरवले सेवा पुरवली जात आहे.
Also Read: Upcoming Smartphones This Week: भारतात ‘या’ आठवड्यात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी
आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या Jio केवळ 2GB दैनिक डेटासह येणाऱ्या प्लॅन्सव्यतिरिक्त त्यावरील डेटा प्रदान करणाऱ्या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा ऑफर करत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही यापेक्षा कमी डेटा असलेले प्लॅन खरेदी केले तर तुम्हाला या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा मिळणार नाही. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अनलिमिटेड 5G चा लाभ घेण्यासाठी रिलायन्स Jio आणि Airtel चे कोणते प्लॅन खरेदी करू शकता, हे जाणून घेउयात.
Jio तुम्हाला पुढील सर्व प्लॅन्ससह अमर्यादित 5G डेटाचा लाभ देणार आहे. 349 रुपयांचा प्लॅन, 629 रुपयांचा प्लॅन, 719 रुपयांचा प्लॅन, 749 रुपयांचा प्लॅन, 859 रुपयांचा प्लॅन, 899 रुपयांचा प्लॅन, 999 रुपयांचा प्लॅन आणि 3599 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित 5G डेटा मिळणार आहे. प्लॅनबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा. रिलायन्स Jio कडे काही डेटा बूस्टर प्लॅन्स देखील आहेत. ज्यासह तुम्ही अनलिमिटेड 5G चा लाभ घेऊ शकता.
Airtel तुम्हाला सर्व अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ मिळणार आहे. 28 दिवसांसाठी 409 रुपयांचा प्लॅन, एक महिन्यासाठी 379 रुपयांचा प्लॅन, 1 महिन्यासाठी 429 रुपयांचा प्लॅन, 28 दिवसांसाठी 549 रुपयांचा प्लॅन, 56 दिवसांसाठी 649 रुपयांचा प्लॅन, 84 दिवसांसाठी 979 रुपयांचा प्लॅन, 84 दिवसांसाठी 1,199 रुपयांचा प्लॅन, 365 दिवसांसाठी 3,599 रुपयांचा प्लॅन, 365 दिवसांसाठी 3,999 रुपयांचा प्लॅन इ. सर्व प्लॅन्ससह तुम्हाला अनलिमिटेड 5G इंटरनेटचा लाभ मिळतो. तुम्ही हे सर्व प्लॅन्स खरेदी करून अमर्यादित 5G इंटरनेटसह आपली अनेक कामे विना अडथडा करू शकता. अमर्यादित 5G डेटासह येणाऱ्या प्लॅनबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्ही Airtel Thanks ऍप किंवा Airtel च्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता.