Jio आणि Airtel ग्राहकांच्या खिशावर परत एकदा ताण पडणार आहे. वृत्तानुसार, लवकरच या कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स महागणार आहेत. हे प्लॅन्स कधी आणि कितीने महागणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. मात्र, यावर बरेच रिपोर्ट्स याआधीही आले आहेत.
रिपोर्ट्सनुसार Jio आणि Airtel च्या प्लॅन्समध्ये 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. असे जर झाले तर, 200 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनची किंमत 220 रुपये असेल. तर, 1000 रुपयांचा प्लॅन 1,100 रुपयांचा असेल.
मिळालेल्या माहितीनुसार वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत Jio आणि Airtel द्वारे रिचार्ज प्लॅन महाग केले जाऊ शकतात. अर्थात, डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महागण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स महागले तर इतर कंपन्यांचे प्लॅन्सदेखील महागण्याची शक्यता आहे.
Airtel आणि Jio चे 4G रिचार्ज प्लॅन महागतीलंच, त्यासोबतच नवीन 5G रिचार्ज प्लॅन देखील लाँच होऊ शकतात.
सध्या Jio आणि Airtel या दोन टेलीकॉम कंपन्या 5G सर्व्हिस देत आहेत, जी पूर्णपणे फ्री आहे. दोन्ही कंपन्याच्या 5G डिव्हाइसेस असलेल्या पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा लाभ मिळतोय. Airtel ने 3000 हून अधिक शहरांमध्ये 5G सर्व्हिस लाँच केली आहे. JIO स्टँडअलोन नेटवर्क सिस्टमवर काम करतो. तर, Airtel नॉन-स्टँडअलोन 5G नेटवर्क सिस्टमवर काम करतो.