Jio आणि Airtel वापरकर्त्यांना मोठा झटका! 4G प्लॅनमध्ये आता मिळणार नाही 5G डेटा? वाचा संपूर्ण डिटेल्स। Tech News 

Jio आणि Airtel वापरकर्त्यांना मोठा झटका! 4G प्लॅनमध्ये आता मिळणार नाही 5G डेटा? वाचा संपूर्ण डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

Jio आणि Airtel ने सर्वप्रथम भारतात 5G आणण्यास सुरुवात केली.

या दोन्ही कंपन्या त्यांच्या 4G प्लॅनमध्ये मोफत 5G सुविधा देत आहेत.

कंपनीचे नवीन 5G प्लॅन 4G पेक्षा 5 ते 10% महाग असू शकतात.

Jio आणि Airtel या भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दोन आघाडीच्या कंपन्या आहेत. आपणा सर्वांना माहितीच आहे की, Jio आणि Airtel ने सर्वप्रथम भारतात 5G आणण्यास सुरुवात केली. सध्या या दोन्ही कंपन्या त्यांच्या 4G प्लॅनमध्ये मोफत 5G सुविधा देत आहेत. मात्र दोन्ही कंपन्यांच्या युजर्ससाठी एक चिंताजनक बातमी आहे. ही सुविधा लवकरच संपुष्टात येऊ शकते.

होय, ताज्या लीक झालेल्या अहवालावर विश्वास ठेवला तर लवकरच या दोन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांचे नवीन 5G प्लॅन लाँच करणार आहेत. कंपनीचे हे नवीन 5G प्लॅन 4G पेक्षा 5 ते 10% महाग असू शकतात, असे म्हटले जात आहे.

jio airtel 5g

4G प्लॅनमध्ये मोफत 5G सर्व्हिस मिळणार नाही?

ताज्या रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, Jio आणि Airtel यूजर्सना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. आतापर्यंत, Jio आणि Airtel ग्राहकांना 4G च्या किमतीत 5G सर्व्हिस मिळत होती, पण हे लवकरच बंद होणार आहे. या दोन्ही कंपन्या 4G प्लॅनमध्ये मोफत अमर्यादित 5G ची सुविधा बंद करू शकतात.

मिळालेल्या अहवालानुसार, Jio आणि Airtel दोघेही 5G साठी वेगळे नवीन प्लॅन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. हे प्लॅन्स 2024 च्या उत्तरार्धात सादर केले जातील. वर सांगितल्याप्रमाणे, नव्या प्लॅन्सची ​​किंमत 4G पेक्षा 5 ते 10% अधिक महाग असेल. महत्त्वाचे म्हणजे, Airtel आणि Jio च्या नवीन 5G प्लॅनमध्ये सध्याच्या 4G प्लॅनपेक्षा 30% जास्त डेटा मिळेल, हे देखील लक्षात घ्या.

Jio आणि Airtel 5G सर्व्हिस

Jio आणि Airtel या भारतातील पहिल्या दोन टेलिकॉम कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी 2022 मध्ये 5G सेवा लाँच केली होती. त्यानंतर आता ही सर्व्हिस भारतातील बहुतांश भागात पोहोचली आहे. एवढेच नाही तर, जवळपास वर्षभरापासून या दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना 4G प्लॅनच्या किमतीत 5G स्पीड देत होत्या. मात्र, आता कंपनीने ही मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षात घ्या की, सध्या Jio आणि Airtel ने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo