Jio-Airtel-Vi: केवळ 5 रुपये दररोजमध्ये, सर्वात स्वस्त 365 दिवसांच्या वैधतेसह सर्वोत्तम रिचार्ज

Jio-Airtel-Vi: केवळ 5 रुपये दररोजमध्ये, सर्वात स्वस्त 365 दिवसांच्या वैधतेसह सर्वोत्तम रिचार्ज
HIGHLIGHTS

Jio-Airtel-Vi चे वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स

Jio च्या प्लॅनमध्ये एकूण 730 GB डेटा उपलब्ध

Vi च्या प्लॅनमध्ये Vi Movies & TV Basic चे मोफत सबस्क्रिप्शन

जर तुम्ही असा एखादा रिचार्ज प्लॅन शोधत असाल जो दीर्घकाळ टिकेल तर टेलीकॉम कंपन्यांकडे अनेक प्लॅन्स आहेत, जे वर्षभराच्या वैधतेसह येतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एकरकमी जास्त रक्कम भरावी लागत असली, तरी ते मासिक किंवा त्रैमासिक प्लॅन्सपेक्षा स्वस्त आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vi च्या सर्वात स्वस्त 365 दिवसांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

हे सुद्धा वाचा : जबरदस्त ! 8GB RAM सह Poco X4 GT लाँच, रु. 6,500 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

Jio चा 2,879 रुपयांचा प्लॅन

या यादीतील सर्वात महागडा प्लॅन रिलायन्स Jio चा आहे. जिओचा 365 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन 2,879 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जात आहे. म्हणजेच तुम्ही या प्लॅनमध्ये एकूण 730 GB डेटाचा आनंद घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि जिओ ऍप्स  सबस्क्रिप्शनचा आनंद घेता येईल.

Airtel चा 1,799 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा सर्वात स्वस्त 1 वर्षाचा प्लॅन फक्त 1,799 रुपये आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 24 GB डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 3600 SMS उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला मोफत HelloTunes, Wink Music आणि Apollo 24×7 Circle चे मोफत सदस्यत्व मिळेल.

Vi चा Rs 1,799 चा प्लॅन 

Vodafone Idea चा प्लॅनदेखील जवळपास Airtel सारखाच आहे. यामध्ये अमर्यादित कॉल, 24 GB डेटा आणि 3600 SMS देखील दिले जातात. यासह, तुम्हाला Vi Movies & TV Basic चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo