Jio, Airtel आणि VI चे दररोज 2GB पर्यंत डेटासह येणारे प्लॅन्स! किंमत 400 रुपयांपेक्षा कमी, पहा संपूर्ण बेनिफिट्स 

Jio, Airtel आणि VI चे दररोज 2GB पर्यंत डेटासह येणारे प्लॅन्स! किंमत 400 रुपयांपेक्षा कमी, पहा संपूर्ण बेनिफिट्स 
HIGHLIGHTS

एका महिन्याच्या वैधतेसह Jio, Airtel आणि VI प्लॅन्स

400 रुपयांअंतर्गत येणारे प्लॅन्स 2GB पर्यंत डेटासह येतात.

विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटाची सुविधा देखील आहे.

भारतातील आघाडीच्या खाजगी दूरसंचार कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे प्रीपेड प्लॅन्स आहेत. एका महिन्याच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स कंपन्यांचे बेस्ट सेलिंग प्लॅन्स असतात. या प्लॅन्समधेय वापरकर्त्यांच्या गरजेनुसार सुपरफास्ट डेटा दिला जातो. तसेच, तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी तासनतास बोलण्यासाठी तुम्हाला अमर्यादित कॉलिंग मिळत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची वैधता 1 महिन्याची असून ते दररोज 2GB डेटासह येतात.

Jio चा 319 रुपयांचा प्लॅन

Jio चा 319 रुपयांचा प्लॅन हा Jio चा प्रीपेड प्लान आहे, ज्याची वैधता एक महिन्याची आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. त्याबरोबरच, यात 100SMS ची सुविधा आणि अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे. Jio च्या रिचार्ज प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.

jio-airtel-and-VI

Airtel चा 379 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 379 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 31 दिवसांची म्हणजेच संपूर्ण महिनाभर वैधता मिळेल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, वैधतेदरम्यान कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगद्वारे तासनतास विना अडथडा बोलता येईल. तर, इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटा मिळणार आहे. त्याबरोबरच, यात दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळेल. विशेष म्हणजे यात अमर्यादित 5G डेटा, Airtel Xstrem Play आणि विनामूल्य हॅलो ट्यूनचा ऍक्सेस मिळेल.

Vodafone Idea 379 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea चा 379 रुपयांचा प्लॅन ट्रूली अनलिमिटेड प्लॅन्स आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जाणार आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच, फोनमध्ये 100SMS देखील उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, हा प्लॅन Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारख्या इतर बेनिफिट्ससह देखील येतो. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo