digit zero1 awards

 Jio, Airtel, VI चे 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स, 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत भरपूर डेटासह Unlimited कॉलिंग

 Jio, Airtel, VI चे 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स, 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत भरपूर डेटासह Unlimited कॉलिंग
HIGHLIGHTS

Jio, Airtel, VI चे 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स

पुढील प्लॅन्सची किमंत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.

पुढील प्लॅन्समध्ये अमर्यादित कॉलिंग, डेटासह मनोरंजनाची सोय देखील आहे.

तुम्ही कमी बजेटमध्ये 3 महिन्यांच्या वैधतेसह येणारे प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी तीन सर्वोत्तम प्लॅन्स आणले आहेत. Jio, Airtel, Vodafone Idea च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग काही प्रमाणात डेटासह उपलब्ध आहे, जेणेकरून वापरकर्ते यासह मूलभूत कामे करू शकतात. जर तुम्हाला जास्त इंटरनेटची गरज नसेल आणि प्लॅन दीर्घकाळासाठी हवा असेल, तर तुम्ही 500 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये येणाऱ्या प्लॅनबद्दल जाणून घ्या.

Jio चा 395 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील वरील प्लॅनमध्ये 6GB डेटा दिला जातो. हा प्लॅनदेखील जवळपास तीन महिन्यांच्या म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित कॉलिंग देखील आहे, ज्यासह तुम्ही बिनधास्त हवं तेवढं बेल फोनवर बोलू शकता. एवढेच नाही तर, यात 1000 मोफत SMS मिळतील. इतर फायद्यांमध्ये Jio Apps चा मोफत ऍक्सेस समाविष्ट आहे.

JIO AIRTEL VI

Airtel चा 455 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्रीपेड प्लॅन एकूण 6GB डेटासह येतो. या प्लॅनची वैधता संपूर्ण 84 दिवसांची आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. हा प्लॅन एकूण 900SMS ऑफर करतो. इतर फायद्यांमध्ये Apollo 24।7 Circle मध्ये मोफत ऍक्सेस, मोफत Hellotunes आणि Wynk Music यांचा समावेश आहे.

Vodafone Idea चा 459 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vodafone Idea च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 6GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता देखील 84 दिवस आहे. हा प्लॅन अमर्यादित कॉलिंगला आणि एकूण 1000SMS ला सपोर्ट करतो. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर, 50p/MB दराने शुल्क आकारले जाते. प्लॅनमधील उपलब्ध इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vi Movies & TV बेसिक ऍक्सेस मिळेल, ज्यामध्ये लाइव्ह टीव्ही, बातम्या, चित्रपट आणि ओरिजिनल्सचा आनंद घेता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo