तुम्ही कमी किमतीत भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह प्रीपेड प्लॅन शोधत आहात? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जे कमी किमतीच्या प्लॅनसह रिचार्ज करतात त्यांच्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी 200 रुपयांच्या खाली अनेक उत्तम रिचार्ज प्लॅन आणले आहेत. आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel, आणि Vodafone-Idea चे 200 रुपयांपेक्षा कमी प्रीपेड प्लॅन्स आणि त्यांच्यावर उपलब्ध असलेले बेनिफिट्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला योग्य प्लॅन निवडण्यात खूप मदत करतील.
हे सुद्धा वाचा : अमिताभ बच्चन यांना 'KBC 14' स्पर्धकाकडून मिळाले 'थग्गू के लड्डू'
Jio चा 149 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये 20 दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज 1GB डेटा मर्यादा उपलब्ध आहे.
Jio चा 179 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये, 24 दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंगसह दररोज 1GB डेटा मर्यादा आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत.
Jio चा 209 रुपयांचा प्लॅन : 28 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा मर्यादा, तसेच दररोज 100 SMS ऑफर करतो.
Airtel चा 155 रुपयांचा प्लॅन : प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, 300 SMS, 1GB डेटा आणि HelloTunes चे अतिरिक्त फायदे आणि 24 दिवसांच्या वैधतेसह Wynk Music ची मोफत सदस्यता मिळते.
Airtel चा 179 रुपयांचा प्लॅन : हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग, 300 SMS, 2GB डेटा आणि HelloTunes चे अतिरिक्त फायदे आणि 24 दिवसांच्या वैधतेसह Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो.
Airtel चा 209 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 100 SMS प्रतिदिन, 1GB दैनंदिन डेटा 21 दिवसांच्या वैधतेसह आणि HelloTunes आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन देतो.
Vi चा 179 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 300 SMS, 2GB डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह Vi Movies आणि TV चे अतिरिक्त फायदे मिळतात.
Vi चा 195 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 300 SMS, 2GB डेटा 1 महिन्याच्या वैधतेसह आणि Vi Movies आणि TV चे अतिरिक्त फायदे आहेत.