5G सेवा येण्याआधी भारतीय ग्राहकांना महागड्या प्लॅनचा मोठा फटका बसू शकतो. कारण अलीकडील अहवालात असे म्हटले आहे, की देशातील तीन प्रमुख दूरसंचार कंपन्या Airtel, Vi आणि Jio त्यांच्या आपल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी टॅरिफ किमती वाढवू शकतात. खरं तर, 5G स्पेक्ट्रमचा लिलाव भारतात संपला आहे, ज्यामध्ये Jio ने 88,078 कोटी रुपयांना 24,740 MHz स्पेक्ट्रम विकत घेतला, Airtel ने 43,084 कोटी रुपयांना 19867.8 MHz स्पेक्ट्रम विकत घेतला. Vodafone Idea ने मिड-बँड 5G स्पेक्ट्रममध्ये 3300 MHz स्पेक्ट्रम आणि mmWave 5G मध्ये 26 GHz स्पेक्ट्रम घेतले.
हे सुद्धा वाचा : 19 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा OnePlus 10T 5G फोन लाँच, मिळतेय हजारो रुपयांची सूट…
टेलिकॉम कंपन्या भारतात 5G सेवा आणण्यासाठी सज्ज झाल्यामुळे, तज्ञ सहमत आहेत की, कंपन्या त्यांच्या अलीकडील खर्चाची भरपाई करतील. यासाठी भारतात टॅरिफ दर वाढवले जाऊ शकतात.
दूरसंचार विभाग (DoT) दूरसंचार कंपन्यांकडून स्पेक्ट्रम वापर शुल्क (SUC) आकारत नाही. विभागाने तीन टक्के फ्लोअर रेटही रद्द केला आहे. या बदलांमुळे, नोमुरा रिसर्चच्या संशोधकांचा असा विश्वास आहे की, तिन्ही दूरसंचार कंपन्यांनी किमतीत चार टक्क्यांनी वाढ करणे अपेक्षित आहे.
रिसर्च ऑर्गनायझेशनने असेही म्हटले आहे की, JIO वापरकर्त्यांना AIRTEL वापरकर्त्यांपेक्षा जास्त दरवाढीचा सामना करावा लागू शकतो. Nomura च्या संशोधकांनी त्यांच्या अहवालात असेही म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या, म्हणजे Jio आणि Airtel, त्यांच्या 5G प्लॅन्ससाठी प्रीमियम किंमत ऑफर करतील अशी अपेक्षा आहे.
ICICI सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे की, दूरसंचार कंपन्या त्यांच्या अलीकडील खर्चाची भरपाई करण्यासाठी टॅरिफमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात. DoT ने पहिल्या इंस्टालमेंटसाठी, पुढील 10 दिवसात 13,500 कोटी रुपये जमा करण्याची अपेक्षा केली आहे. ज्यात Jio सुमारे 7838 कोटी रुपये, एअरटेल सुमारे 3834 कोटी रुपये, Vi सुमारे 1673 कोटी रुपये आणि अदानी डेटा नेटवर्क अंदाजे 212 कोटी जमा करेल, अशी माहिती मिळाली आहे.
टेरिफ वाढ पहिल्यांदा गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली होती. आता दुसरी वाढ लवकरच होण्याची शक्यता आहे.