Jio, Airtel आणि VI कडे 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारे प्लॅन्स आहेत. यामध्ये 3 महिन्यांच्या वैधतेसह प्लॅन्स येतात. ग्राहकांसाठी या प्लॅन्समध्ये उत्तम आणि अप्रतिम बेनिफिट्स देण्यात आले आहेत. आम्ही या बजेटमध्ये येणार्या Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या प्लॅनची माहिती देत आहोत. याद्वारे तुम्ही स्वतःसाठी योग्य पर्याय निवडू शकणार आहात.
VI चा हा प्लॅन दररोज 2.5GB हाय स्पीड डेटा ऑफर करतो. म्हणजेच, यामध्ये एकूण 75GB डेटा मिळतो. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत.
इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास. Disney + Hotstar Mobile आणि Vi Movies & TV VIP प्रवेश या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. अनलिमिटेड नाईट डेटा वीकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत 2GB डेटाचा बॅकअप दिला जातो.
यामध्ये दररोज 3GB हायस्पीड डेटा दिला जातो. प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. वरील प्लॅनप्रमाणे, या प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातील. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम ऍप, एअरटेल थँक्स, अपोलो 24|7 सर्कल, मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक ऍपचे मोफत सबस्क्रिप्शन दिले आहे.
JIO च्या 395 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 6GB हायस्पीड डेटा दिला जातो. हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आले आहे. त्याबरोबरच, यामध्ये एकूण 1000 SMS देण्यात आले आहेत. इतर फायद्यांमध्ये Jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.