आपणा सर्वांना माहितीच आहे की, Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या खाजगी दूरसंचार ऑपरेटर्सनी अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. या दरवाढीचा फटका प्रत्येक युजरला लागला आहे. या कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. या बदलानंतर, भारतातील अनेक दूरसंचार ग्राहक सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळताना दिसत आहेत. कारण BSNL चे प्लॅन्स इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत खूप स्वस्त पडतात.
या रिपोर्टमध्ये आम्ही BSNL, Jio, Vi आणि Airtel च्या रिचार्ज प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही BSNL, Jio, Vi आणि Airtel च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, जे दररोज 3GB डेटा देतात. यासह, तुम्हाला टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये तुमच्या पैशासाठी सर्वोत्तम मूल्य देणारा रिचार्ज प्लॅन निवडण्यात मदत होईल.
2999 रुपयांचा प्लॅन: डेली 3GB डेटासह BSNL केवळ एक प्लॅन ऑफर करतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षभराची वैधता दिली जाते. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 3GB डेटा आणि दररोज 100SMS ची सुविधा उपलब्ध आहे.
838 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 3GB डेटा आणि 100 SMS देखील मिळतात. तसेच, अमर्यादित 5G डेटासोबत, Airtel Xstream Play आणि Amazon प्राइम मेंबरशिप देखील दिली जात आहे.
549 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100SMS सह 3GB डेली डेटा उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सना Airtel Xstream Play आणि Disney + Hotstar मोबाईलचे फायदे 3 महिन्यांसाठी मिळतात.
449 रुपयांचा प्लॅन: हा प्रीपेड प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. हे अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 3GB दैनिक डेटा, दररोज 100 SMS, Airtel Extreme Play, आणि अमर्यादित 5G डेटा सारखे लाभ मिळतात.
1798 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 84 दिवसांसाठी वैध आहे. प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 3GB डेटा आणि 100 SMS देतो. तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा आणि Netflix (बेसिक) चे ऍक्सेस देखील मिळेल.
1,799 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 3GB डेटा आणि 100 SMS उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित 5G डेटा देखील समाविष्ट आहे.
1,199 रुपयांचा प्लॅन: कंपनीचा 84 दिवसांच्या वैधतेसह देखील येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 3GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. तसेच. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील समाविष्ट आहे.
449 रुपयांचा प्लॅन: Jio चा प्लॅन 28 दिवसांची वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग, 3GB दैनिक डेटा, 100 SMS प्रतिदिन ऑफर करतो. तसेच, यात अमर्यादित 5G डेटा देखील उपलब्ध आहे.
795 रुपयांचा प्लॅन: हा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांसाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 3GB डेटा आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळते. याशिवाय, यात रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत अमर्यादित नाईट डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि 2GB बॅकअप डेटा देखील मिळेल.
449 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमधील बेनिफिट्समध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 3GB डेटा आणि 100 SMS चे फायदे उपलब्ध आहेत. तसेच, वरील प्लॅनप्रमाणे, या प्लॅनमध्ये अमर्यादित नाईट डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत 2GB बॅकअप डेटा देखील उपलब्ध आहे.