रिलायन्स Jio ही भारतातील सर्वात मोठी आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर आहे. कंपनी अनेकदा आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. Jio कडे असाच एक प्रीपेड प्लॅन 209 रुपयांचा आहे, जो अप्रतिम फायद्यांसह येतो. त्याचप्रमाणे, Airtel आणि Vodafone Idea कडे देखील 209 रुपयांचे प्रीपेड प्लॅन आहेत. पण ते Jio च्या प्लॅन्समोर जरा मागे पडतात. चला तर मग बघुयात Jio, Airtel आणि Vi मध्ये कोणता 209 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सर्वोत्तम आहे.
Jio च्या 209 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1GB हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधाही मिळते. याशिवाय, तुम्हाला हे सर्व फायदे 28 दिवसांसाठी मिळतील. या पॅकमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud वर मोफत ऍक्सेस दिला जातो.
Airtel कडे देखील समान किमतीचा 209 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना फक्त 21 दिवसांची वैधता मिळेल. वैधतेदरम्यान, तुम्ही दररोज 1GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ घेऊ शकता. या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये विनामूल्य HelloTunes आणि Wynk Music सदस्यत्व देखील समाविष्ट आहे.
Vodafone Idea चा 209 रुपयांचा प्रीपेड पॅक देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. परंतु या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त 4GB इंटरनेट डेटा मिळतो. यामध्ये अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100SMS चा लाभ घेऊ शकता. यासह प्लॅनमध्ये वापरकर्त्यांच्या मनोरंजनाची सोय आहे. Vi Movies & TV चे मोफत सबस्क्रिप्शन यात समाविष्ट आहे. ज्यामध्ये 5000 हून अधिक चित्रपट आणि शो इ. 200 हून अधिक टीव्ही चॅनेलचा समावेश आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, सर्व कंपन्यांच्या प्लॅन्समधील बेनिफिट्स बघता Jio चा प्रीपेड प्लॅन Airtel आणि Vodafone Idea च्या तुलनेत सर्वोत्तम आहे. Jio सह, तुम्हाला Airtel पेक्षा 7 दिवस अधिक सेवा वैधता मिळत आहे, तर डेटाच्या बाबतीत Jio चा प्लॅन VI पेक्षा अधिक पुढे आहे.