Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा जास्त प्रीपेड प्लॅन आहेत. या कंपन्या वापरकर्त्यांना एक वर्षापर्यंत वैधता असलेले प्लॅन देखील देत आहेत. मात्र, आज आम्ही या कंपन्यांच्या केवळ महिन्याभराच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत. हे प्लॅन युजर्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB पर्यंत डेटा आणि एका महिन्याच्या वैधतेसह अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. चला तर मग यापैकी कोणती कंपनी युजर्सना सर्वोत्तम फायदे देत आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : खुशखबर ! आता OnePlus आणि Oppo च्या प्रत्येक फोनमध्ये चालेल 5G, लगेच होतील सर्व कामे
एका महिन्याची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 GB इंटरनेट डेटा आणि अमर्यादित कॉलिंग देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत SMS देखील मिळतील. Vodafone-Idea या प्लॅनमध्ये जास्तीत जास्त अतिरिक्त लाभ मिळत आहेत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Binge ऑल नाईट मिळेल. यामध्ये तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा वापरता येईल. याशिवाय, तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट देखील मिळेल. कंपनी प्लॅनच्या सदस्यांना Vi Movies आणि TV ऍपचे फ्री ऍक्सेस देखील देत आहे.
AIRTEL चा हा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2 GB डेटा देत आहे. AIRTEL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 100 मोफत SMS देखील देत आहे. तसेच, यामध्ये तुम्हाला हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकच्या मोफत सबस्क्रिप्शनसह फास्टॅग रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.
JIO चा हा प्लॅन एका महिन्यासाठी चालतो. यामध्ये कंपनी दररोज 1.5 GB डेटा देते. प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 100 मोफत SMS सह देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील मिळते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio ऍप्सची मोफत सदस्यता समाविष्ट आहे.