Jio, Airtel आणि VI चे 300 रुपयांअंतर्गत येणारे प्लॅन्स, मिळतो भरपूर डेटा

Jio, Airtel आणि VI चे 300 रुपयांअंतर्गत येणारे प्लॅन्स, मिळतो भरपूर डेटा
HIGHLIGHTS

Jio, Airtel आणि Vi चे अनेक प्रीपेड प्लॅन आहेत.

या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे.

दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळेल.

Jio, Airtel आणि Vi कडे आपल्या युजर्ससाठी अनेक किफायती प्रीपेड प्लॅन्स आहेत. या सर्व प्लॅनमध्ये भरपूर हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. जर तुम्ही 300 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला तर बघुयात तिन्ही टेलिकॉम दिग्गज कंपन्यांचे 300 रुपयांअंतर्गत येणारे प्लॅन्स- 

JIO : 

299 रुपयांचा प्लॅन: . यामध्ये दररोज 100 SMS आणि 2GB डेटा मिळतो. तसेच, मोफत कॉलिंगची सुविधा आहे. इतर फायद्यांमध्ये Jio TV, Movies, Security आणि Cloud चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.

259 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 100SMS आणि 1.5GB डेटा मिळतो. तसेच, नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे.

AIRTEL  : 

299 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. तसेच, मोफत कॉलिंगसोबतच दररोज 1.5GB डेटा आणि 100SMS मिळतील. प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि फ्री हॅलोट्यून्सचा ऍक्सेस मिळेल. 

296 रुपयांचा प्लॅन: प्लॅनमध्ये एकूण 25GB डेटा देत आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगचा सपोर्टही दिला जात आहे. हा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. 

VI : 

296 रुपयांचा प्लॅन:  यामध्ये 30 दिवसांसाठी एकूण 25GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह Vi Movies आणि Live TV चा ऍक्सेस मिळणार आहे. 

269 रुपयांचा प्लॅन: VI चा हा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 1GB डेटा आणि 100SMS मिळतात. तसेच प्लॅनमध्ये 4GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह Vi Movie आणि Live TV चे सबस्क्रिप्शन देखील आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo