जनसामान्यांना आणखी एक धक्का ! Jio, Airtel आणि VIचे प्लॅन महागणार, किंमत 20% वाढणार

Updated on 01-Jun-2022
HIGHLIGHTS

Jio, Airtel आणि VIचे प्लॅन महागणार

देशांतर्गत रेटिंग एजेन्सी क्रिसिलच्या अहवालातील माहिती

टॅरिफ प्लॅन्सचे दर 20%पर्यंत वाढण्याची शक्यता

देशातील खाजगी क्षेत्रातील प्रमुख तीन टेलिकॉम कंपन्या म्हणजेच Jio, Airtel आणि VI चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून परत एकदा टॅरिफ प्लॅन्सचे दर वाढवू शकतात. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे 2022-23 या आर्थिक वर्षात या कंपन्यांचे उत्पन्न 20-25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले आहे. असे न केल्यास स्पेक्ट्रम आणि नेटवर्कमधील गुंतवणुकीमुळे त्यांचे नुकसान होऊ शकते, असे कंपन्यांचे मत आहे. टॅरिफ प्लॅन्सचे दर 20%पर्यंत वाढणार असल्याचे समोर आले आहे. देशांतर्गत रेटिंग एजन्सी क्रिसिलने ही माहिती दिली आहे.

देशांतर्गत रेटिंग्स एजन्सी क्रिसिलचा अहवाल

देशांतर्गत रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालात असे म्हटले आहे की, उद्योगासाठी नेटवर्क आणि स्पेक्ट्रममध्ये  गुंतवणूक करण्यासाठी प्रति वारपकर्ता सरासरी  महसूल वाढवणे आवश्यक आहे. असे न केल्यास सेवेचा दर्जा खाली जाऊ शकतो. रिलायन्स जिओच्या आगमनाने सुरू झालेल्या तीव्र स्पर्धेनंतर डिसेंबर 2019 पासून हे दर वाढण्यास सुरुवात झाली.

हे सुद्धा वाचा: Poco X4 GT स्मार्टफोनची लवकरच भारतात एंट्री, 67W चार्जिंगसह मिळतील जबरदस्त फीचर्स

नफ्यात 5% कपात

अहवालात म्हटले आहे की, गेल्या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या प्रति ग्राहक कमाईत 5 टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या आर्थिक वर्षात या कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली होती, कारण 370 दशलक्ष ग्राहक इनऍक्टिव्ह होते.

15-20 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते

अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात या तीन कंपन्यांच्या महसुलात 20-25 टक्क्यांनी जोरदार वाढ होण्याची अपेक्षा आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, 2021-22 मध्ये प्रति वापरकर्ता सरासरी महसूल म्हणजेच ARPU  पाच टक्क्यांच्या संथ वाढीनंतर, आता 2022-23 मध्ये 15-20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वाढवले होते दर

ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान, रिलायन्स जिओच्या ऍक्टिव्ह ग्राहकांची संख्या 94 टक्के होती. भारती एअरटेलचे 99 टक्के सक्रिय ग्राहक होते. व्होडाफोन आयडियाने 30 दशलक्ष सक्रिय ग्राहक गमावले कारण त्यांनी 4G सेवांमध्ये जास्त गुंतवणूक केली नाही. याआधी या तिन्ही कंपन्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 20-25 टक्क्यांनी दर वाढवले ​​होते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :