टेलिकॉम कंपन्या अनेक उत्तम ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करतात. यामध्ये ग्राहकांना कॉमन बेनिफिट्ससह काही विशेष सुविधा देखील मिळतात. त्यामुळे ब्रॉडबँड प्लॅन्सना ग्राकांकडून चांगलीच पसंती दिली जाते. आज आम्ही या लेखात JIO, AIRTEL आणि BSNL च्या 999 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. बघुयात सविस्तर तपशील –
JIO कंपनीच्या 999 रुपयांच्या फायबर प्लॅनमध्ये तुम्हाला 3.3TB डेटा मिळतो. हा डेटा 150Mbps च्या स्पीडसह मिळणार आहे. या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग देखील मिळणार आहे. याव्यतिरिक्त, 14 पेक्षा जास्त OTT ऍप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.
AIRTEL कंपनीचा 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन प्रीमियम प्लॅन आहे. प्लॅनमध्ये 2000Mbps च्या स्पीडसह इंटरनेट डेटाचा लाभ मिळेल. यासोबतच अमर्यादित कॉलिंगदेखील मिळणार आहे. मनोरंजनसाठी यात Netflix, Amazon Prime आणि Hotstar सारख्या OTT ऍप्सचे सब्सक्रिप्शन मिळेल. यासोबतच Airtel Xtreme, विंक म्युझिक आणि हॅलो ट्यून्सचे ऍक्सेस मिळेल.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL देखील 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये 150Mbps च्या स्पीडसह एकूण 2TB डेटा दिला जातो. यामध्ये Hotstar आणि Lionsgate सारख्या OTT ऍप्सचे मोफत ऍक्सेस मिळेल. इतर प्लॅनप्रमाणे यातही कॉलिंग सुविधा मिळेल.