सध्या OTT चे ट्रेंड सुरु असलेल्या जगात Netflix आणि Disney + Hotstar इत्यादी लोकप्रिय स्ट्रीमिंग सेवांसह येणारे सबस्क्रिप्शन आणि डेटा प्लॅन्स खूप महाग मिळत आहेत. अशा परिस्थितीत, Jio त्याच्या नवीन लाँच केलेल्या Jio AirFiber कनेक्शन पॅकेजेसमध्ये इतर OTT प्लॅन्ससह Netflix आणि Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. जेणेकरून वापरकर्ते त्यांच्या बजेटवर ताण न ठेवता त्यांच्या आवडत्या शोचा आनंद घेऊ शकतात.
या प्लॅन्ससह वापरकर्त्यांना केवळ हाय-स्पीड इंटरनेटच नाही तर त्यांना एकाधिक सबस्क्रिप्शन व्यवस्थापित करण्याचा त्रास आणि खर्चही वाचणार आहे. त्यामुळे तुम्हाला OTT बेनिफिट्ससह नवीन वायरलेस कनेक्शन घ्यायचे असल्यास Jio कडे सर्वोत्तम प्लॅन्स आहेत. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि मोफत OTT लाभ देण्यात येतील. संपूर्ण माहिती सविस्तर वाचा-
Jio चा हा प्लॅन 100Mbps इंटरनेट स्पीड देतो. याशिवाय, यामध्ये 550+ डिजिटल चॅनेल आणि Netflix, प्राइम व्हिडिओ, Disney+ Hotstar, JioCinema Premium इ. सारख्या अनेक OTT Apps चे सदस्यत्व देखील मिळणार आहे.
हा मस्त प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह 300 Mbps इंटरनेट स्पीड येतो. इतर सर्व फायदे वर नमूद केलेल्या प्लॅनसारखेच आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला 550+ डिजिटल चॅनेल आणि नेटफ्लिक्स बेसिक, प्राइम व्हिडिओ, Disney+ Hotstar, Sony Liv, Zee5 इ. OTT ऍप्स देखील मिळतात. लक्षात घ्या की, जिओचा 1499 रुपयांचा प्लॅन निवडक ठिकाणी उपलब्ध आहे.
2499 रुपयांचा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये 500Mbps इंटरनेट स्पीड, 550+ डिजिटल चॅनेल आणि नेटफ्लिक्स स्टँडर्ड, प्राइम व्हिडिओ, Disney + Hotstar, Sony LIV, ZEE5 इ.सारखे OTT ऍप्सचे ऍक्सेस उपलब्ध आहेत.
Jio चा 3,999 रुपयांचा Max प्लॅन 30 दिवसांसाठी 1 Gbps हाय-स्पीड इंटरनेट ऑफर करतो. त्याबरोबरच, हा प्लॅन 550+ डिजिटल चॅनेल आणि नेटफ्लिक्स प्रीमियम, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, सोनी लिव्ह, Zee5 इत्यादी सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे ऍक्सेस देतो.