JIO लवकरच लाँच करणार नवी सर्व्हिस ! सुपरफास्ट चालेल इंटरनेट

JIO लवकरच लाँच करणार नवी सर्व्हिस ! सुपरफास्ट चालेल इंटरनेट
HIGHLIGHTS

JIO लवकरच Jio AirFiber नावाची नवी सर्व्हीस लाँच करणार

वापरकर्त्यांना फक्त एक डिव्हाइस चालू करणे आवश्यक आहे.

उपकरणाद्वारे तुम्हाला तुमच्या घरात 5G हॉटस्पॉट मिळणार आहे.

JIO लवकरच Jio AirFiber नावाची नवी सर्व्हीस लाँच करणार आहे. Jio AirFiber पहिल्यांदा रिलायन्स जिओने 45 व्या AGM मध्ये म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केले होते. मात्र, कंपनीने कधीही त्याच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आता द इकॉनॉमिक्स टाईम्सच्या नवीन अहवालात असे म्हटले आहे की, AirFiber येत्या काही महिन्यांत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. 

Jio AirFiber 

Jio ने असेही म्हटले आहे की, Jio AirFiber तुम्हाला सुपरफास्ट 5G इंटरनेट कोणत्याही व्यत्ययाशिवाय आणि अगदी कमी वायरसह प्रदान करणार आहे. वापरकर्त्यांना फक्त एक डिव्हाइस चालू करणे आवश्यक आहे, ते डिव्हाइसच्या राउटरसारखे असेल. या उपकरणाद्वारे तुम्हाला तुमच्या घरात 5G हॉटस्पॉट मिळणार आहे.

 आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की पोर्टेबल राउटरऐवजी तुम्हाला याद्वारे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जिओने असेही म्हटले आहे की, "जिओ एअरफायबरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घर आणि ऑफिसमध्ये गीगाबाइट-स्पीड इंटरनेट अतिशय वेगाने चालवू शकता."

तथापि, युजर्सना हे स्वातंत्र्य देखील मिळणार आहे की, ते कोणतीही वेबसाइट ब्लॉक देखील करू शकतात. ते एक वायरलेस डिव्हाइस आहे म्हणून ते सेटअप करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही टेक्निशनची आवश्यकता नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo