आपण सर्वांना माहितीच आहे की, Jio AirFiber ही कंपनीची 5G FWA (फिक्स्ड वायरलेस एक्सेस) सेवा आहे. ही सेवा आतापर्यंत भारतातील 5352 शहरांमध्ये सुरू झाली आहे. या सेवेअंतर्गत कंपनीने आता एक नवीन ऑफर आणली आहे, जी काही लिमिटेड टाइमसाठी लाइव्ह राहणार आहे. आता कंपनी आपल्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांना 50 दिवसांपर्यंत मोफत Jio AirFiber सेवा देत आहे. लक्षात घ्या की, कंपनीने 16 मार्च रोजी ही ऑफर जारी केली होती, जी अजूनही उपलब्ध आहे. वापरकर्ते 30 एप्रिलपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
हे सुद्धा वाचा: BSNL ने लाँच केले तब्बल 4000GB डेटासह दोन स्वस्त प्लॅन, OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल Free। Tech News
आम्ही तुम्हाला सांगतो की, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024 Jio Cinema वर लाइव्ह स्ट्रीम होत आहे. त्यामुळे अधिकाधिक वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतात आणि मोफत IPL चा आनंद घेऊ शकतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता या ऑफरशी संबंधित अधिक तपशील जाणून घेऊयात-
ताज्या माहितीनुसार, कंपनी आपल्या ग्राहकांना Jio AirFiber सेवा 50 दिवसांसाठी पूर्णपणे मोफत देत आहे. लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त Jio True5G ग्राहकांसाठी आहे. याशिवाय, या ऑफरचा लाभ फक्त ते ग्राहक घेऊ शकतात, जे त्यांच्या डिव्हाइसवर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून Jio 5G नेटवर्क वापरत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही ऑफर Jio AirFiber 599 रुपयांच्या रिचार्जवर उपलब्ध असेल. या प्लॅनसाठी वापरकर्त्यांना 6 किंवा 12 महिन्यांचे आगाऊ पेमेंट करणे आवश्यक आहे.
या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झल्यास, या प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडमध्ये 1000GB डेटा उपलब्ध आहे. तुम्ही अखंडितपणे इंटरनेट चालवू शकता. यासह, वापरकर्त्यांना 550 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेलचा सपोर्ट देखील मिळतो. OTT फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी Disney + Hotstar, SonyLiv, ZEE5, JioCinema सारख्या 13 OTT चे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.