Jio AirFiber: देशातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Jio ने Jio AirFiber वापरकर्त्यांसाठी स्वस्त प्लॅन्स लाँच केले आहेत. हे सर्व प्लॅन्स दीर्घकालीन वैधतेसह सादर करण्यात आले आहेत. महिन्यांच्या वैधतेसह येतात. या प्लॅनमध्ये तब्बल 100Mbps पर्यंत स्पीडवर इंटरनेट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, प्लॅनमध्ये OTT सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Jio AirFiber च्या नवीन प्लॅनचे तपशील-
Jio AirFiber च्या 30Mbps स्पीड प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. हा प्लॅन तुम्हाला संपूर्ण तीन महिन्यांच्या वैधतेसह लाभ देणार आहे. या प्लॅनमध्ये 1000GB डेटा दिला जात आहे. तसेच, OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, SonyLIV, ZEE5, JioCinema, SunNXT, Hoichoi, Discovery +, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay, EpicON आणि ETV Win चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
Jio AirFiber युजर्ससाठी दोन प्लॅन बाजारात सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही प्लॅन्सच्या किंमती 899 रुपये आणि 1199 रुपये आहेत.
899 रुपयांचा प्लॅन: जर आपण 899 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोललो तर ते 30Mbps प्लॅनसह OTT लाभ देत आहे. Disney + Hotstar, SonyLIV, ZEE5, JioCinema, SunNXT, Hoichoi, Discovery +, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, DocuBay, EpicON, ETV Win तसेच Netflix आणि Amazon Prime Lite चे सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.
1199 रुपयांचा प्लॅन: 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये, Disney + Hotstar, SonyLIV, ZEE5, JioCinema, SunNXT, Hoichoi, Discovery +, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, DocuBay, EpicON, ETV Win तसेच Netflix आणि Amazon Prime Lite देण्यात येत आहे. तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 100Mbps च्या स्पीडने इंटरनेट डेटा वापरता येईल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, Jio AirFiber चे नवीन प्लॅन एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी खरेदी केले जाऊ शकतात. तर, एक वर्षाची मुदत निवडणाऱ्या ग्राहकांना इन्स्टॉलेशन फी भरावी लागणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, इन्स्टॉलेशन फी ची किंमत 1,000 रुपये इतकी आहे. नवीन कनेक्शन अधिकृत वेबसाइट आणि ॲपवरून खरेदी करता येईल.