digit zero1 awards

Jio New Plan: तब्बल 15 OTT ऍप्स आणि Unlimited डेटासह कंपनीचा नवा प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत 

Jio New Plan: तब्बल 15 OTT ऍप्स आणि Unlimited डेटासह कंपनीचा नवा प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत 
HIGHLIGHTS

Jio ने आपल्या Jio AirFiber वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्लॅन सादर केला.

Jio कंपनीचा हा नवा प्लॅन 888 रुपये किमतीचा आहे.

या प्लॅनमध्ये भरपूर डेटासह युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे.

भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio ने आपल्या Jio AirFiber वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्लॅन सादर केला आहे. जर तुम्हाला एकाच प्लॅनमध्ये सर्व महत्त्वाच्या बेनिफिट्ससह मनोरंजनाची देखील सोय हवी असेल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे. कंपनीचा हा नवा प्लॅन 888 रुपयांना सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ 15 प्रीमियम OTT ॲप्सच नाही तर अमर्यादित डेटाही दिला जात आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन JioFiber आणि Jio AirFiber या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

Jio AirFiber 888 रुपयांचा प्लॅन

Jio AirFiber 888 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30Mbps चा स्पीड मिळणार आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटाचा लाभ देखील मिळेल. याव्यतिरिक्त, ग्राहकांच्या मनोरंजनाची सोय सुद्धा या प्लॅनमध्ये करण्यात आली आहे. Netflix चे मूलभूत प्लॅन Amazon Prime आणि JioCinema Premium सारख्या 15 हून अधिक आघाडीच्या OTT ॲप्स प्लॅनसह एकत्रित आहेत. Jio चे सर्व सर्व विद्यमान प्रीपेड वापरकर्ते सहजपणे नवीन पोस्टपेड प्लॅनमध्ये अपग्रेड करू शकतात.

Reliance Jio airfiber 888rs plan
Reliance Jio

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, नुकतीच जाहीर केलेली Jio IPL धन धना धन ऑफर देखील या प्लॅनवर लागू होईल. JioFiber किंवा AirFiber चे पात्र ग्राहकांना त्यांच्या Jio होम ब्रॉडबँड कनेक्शनवर 50 दिवसांच्या डिस्काउंट क्रेडिट व्हाउचरचा लाभ देखील मिळेल. ही ऑफर 31 मे 2024 पर्यंत उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, Jio DDD ऑफर खास T20 सीझनसाठी तयार करण्यात आली आहे.

Jio धन धना धन ऑफर

Jio AirFiber Plus धन धना धन ऑफरमध्ये सध्याच्या वेगापेक्षा तिप्पट वेग असेल. Jio AirFiber Plus कनेक्शन घेणारे नवीन वापरकर्ते रिचार्ज केल्यानंतर आपोआपच ऑफर केलेल्या स्पीडवर अपग्रेड केले जातील. सध्याच्या वापरकर्त्यांना Jio कडून स्पीड अपग्रेडबाबत पुष्टीकरण Email आणि SMS मिळेल. ही ऑफर 6 महिने किंवा 12 महिन्यांच्या Jio AirFiber Plus प्लॅनवर असलेल्या ग्राहकांना लागू आहे. स्पीड बूस्टर ऑफर केवळ 5G-आधारित FWA तंत्रज्ञान वापरणाऱ्या Jio AirFiber वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo