Jio कंपनी आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे आणि युजर्सना आश्चर्यचकित करणारे प्लॅन्स ऑफर करते. सर्वांना माहितीच आहे की, कंपनीने नुकतीच म्हणजेच सप्टेंबरमध्ये Jio AirFiber सेवा सुरू केली आहे. ही कंपनीची 5G FWA म्हणजेच फिक्स्ड-वायरलेस एक्सेस सर्व्हिस आहे. लाँच दरम्यान कंपनीने या सेवेअंतर्गत 6 नवीन योजना लाँच केल्या होत्या. दरम्यान, आता कंपनीने Jio AirFiber सर्व्हिस अंतर्गत आणखी एक स्वस्त प्लॅन सादर केला आहे. लक्षात घ्या की, या प्लॅनची किंमत फक्त 401 रुपये आहे. बघुयात सविस्तर माहिती-
Jio AirFiber सर्व्हिसच्या या नवीन प्लॅनची किंमत 401 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला तब्बल 1TB डेटाचा लाभ देण्यात येणार आहे. मिळतो. महत्त्वाचे लक्षात घ्या की, Jio चा हा प्लॅन एक डेटा बूस्टर प्लॅन आहे, जो तुमच्या ऍक्टिव्ह बेस प्लॅनसह वापरकर्त्यांच्या अतिरिक्त डेटाची गरज भागवेल. या प्लॅनची वैधता देखील तुमच्या ऍक्टिव्ह बेस प्लॅनच्या वैधतेइतकीच असणार आहे.
Jio AirFiber सर्व्हिस अंतर्गत Jio AirFiber Regular आणि Jio AirFiber Max प्लॅन्सचा समावेश आहे. नियमित प्लॅनमध्ये तीन प्लॅन आहेत, ज्यांची किंमत 599 रुपये, 899 रुपये आणि 1199 रुपये आहे. तर, मॅक्स प्लॅनमध्ये 1499 रुपये, 2499 रुपये आणि 3,999 रुपये किंमतीचे प्लॅन्स ऑफर केले गेले आहेत.
599 रुपयांचा प्लॅन– या प्लॅनमध्ये तुम्हाला 30Mbps च्या स्पीडने अमर्यादित डेटा मिळतो. या व्यतिरिक्त यात 14 OTT Apps चे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.
899 रुपयांचा प्लॅन– हा प्लॅन 100Mbps स्पीडवर अमर्यादित डेटा देतो. 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 OTT Apps उपलब्ध आहेत.
1199 रुपयांचा प्लॅन– यामध्ये 14 OTT Apps व्यतिरिक्त, Netflix, Amazon Prime Video आणि JioCinema Premium चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. हा प्लॅन देखील 100Mbps स्पीडवर अमर्यादित डेटा देतो.
1499 रुपयांचा मॅक्स प्लॅन– या प्लॅनमध्ये 300mbps स्पीडने इंटरनेट डेटा मिळणार आहे. यात 14 OTT ऍप्स व्यतिरिक्त Netflix, Amazon Prime Video आणि JioCinema Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
2,499 रुपयांचा प्लॅन– या प्लॅनमध्ये 500mbps वेगाने डेटा मिळतो. 14 OTT ऍप्स व्यतिरिक्त Netflix, Amazon Prime Video आणि JioCinema Premium चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध.
3,999 रुपयांचा प्लॅन– या प्लॅनमध्ये 1000mbps स्पीडने डेटा एक्सेस मिळतो. वरील दोन्ही प्लॅन्सप्रमाणे यामध्ये देखील 14 OTT ऍप्स व्यतिरिक्त Netflix, Amazon Prime Video आणि JioCinema Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.