Jio AirFiber Independence Day Offer 2024: ग्राहकांसाठी Special ऑफर! मिळेल तब्बल 1000 रुपयांचा ऑफ
Jio ने आता AirFiber Independence Day 2024 ऑफर सादर केली आहे.
Jio ची ही ऑफर 26 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत लाइव्ह असेल.
Jio ची ऑफर 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांच्या प्लॅनवर उपलब्ध असेल.
Jio ने अलीकडेच जुलै महिन्याच्या सुरुवातीला प्रीपेडसह आपले पोस्टपेड प्लॅन्स देखील महाग केले आहेत. या दरवाढीनंतर आता कंपनी आपल्या नवीन ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणत आहे. या सिरीजमध्ये, Jio ने आता AirFiber Independence Day 2024 ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत नवीन AirFiber इन्स्टॉल करणाऱ्या वापरकर्त्यांना मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
Jio AirFiber Independence Day Offer 2024
Jio इंडिपेंडन्स डे ऑफर 2024 अंतर्गत, कंपनी आपल्या नवीन वापरकर्त्यांकडून Jio AirFiber इंस्टॉल करण्यासाठी इंस्टॉलेशन शुल्क आकारणार नाही. सामान्य दिवसात कंपनी ग्राहकांकडून 1000 रुपये इन्स्टॉलेशन चार्जेस घेते. मात्र, नवीन जिओ इंडिपेंडन्स डे ऑफर 2024 ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना यापुढे इंस्टॉलेशनसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
मर्यादित काळासाठी ऑफर उपलब्ध
महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर 26 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत लाइव्ह असेल. ही ऑफर 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांच्या प्लॅनवर उपलब्ध असेल. इच्छुक ग्राहक Jio च्या अधिकृत वेबसाइट Jio.com ला भेट देऊन आणि संपर्क तपशील प्रविष्ट करून त्यांचे Jio AirFiber कनेक्शन मिळवू शकतात. याशिवाय तुमची आवड दाखवण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 60008-60008 वर मिस्ड कॉल देऊ शकता.
पुढील प्लॅन्सवर ऑफर्स उपलब्ध
Jio AirFiber चा एंट्री लेव्हल प्लॅन 599 रुपयांचा आहे. 3 महिन्यांसाठी तुम्हाला Jio AirFiber प्लॅनसाठी 2,121 रुपये द्यावे लागतील. याशिवाय, 1000 रुपये वेगळा इन्स्टॉलेशन चार्ज भरावा लागतो. अशा प्रकारे, या कनेक्शनसाठी तुम्हाला 3,121 रुपये द्यावे लागतील. मात्र, आता ऑफर अंतर्गत युजर्सना या कनेक्शनसाठी 1000 रुपये इन्स्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाही. अशा प्रकारे तुमच्या नवीन Jio AirFiber कनेक्शनची किंमत केवळ 2,121 रुपये असेल.
बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio AirFiber प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना 13 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय, 800 हून अधिक डिजिटल TV चॅनेल मोफत उपलब्ध असतील. तसेच, तुम्हाला 1 महिन्यात 1TB पर्यंत डेटा वापरता येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile