रिलायन्स Jio ने आपली बहुप्रतिक्षित Jio AirFiber सेवा आज 19 सप्टेंबर रोजी भारतात लाँच केली आहे. जिओने गेल्या महिन्यात रिलायन्स AGM 2023 मध्ये लाँच करण्याची घोषणा केली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने सध्या दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि अहमदाबाद या 8 सर्कल्समध्ये ही सेवा लाईव्ह केली आहे. येत्या काळात ही सेवा आणखी शहरांमध्ये लाँच केली जाईल. चला जाणून घेऊयात नव्या सर्व्हिसबद्दल सविस्तर माहिती.
Jio AirFiber सर्व्हिस वापरकर्त्यांना कोणत्याही वायरशिवाय सुपरफास्ट इंटरनेट प्रदान करेल. वापरकर्ते त्यांच्या घरी आणि कार्यालयात ही सर्व्हिस वापरू शकतात. कंपनीने Jio AirFiber अंतर्गत दोन प्लॅन्स देखील लाँच केले आहेत. Jio AirFiber प्लॅनची सुरुवातीची किंमत 599 रुपये आहे. तर, दुसरा प्लॅन AirFiber Max आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 1,499 रुपये आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीच्या Jio AirFiber प्लॅनची सुरुवातीची किंमत 599 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 30Mbps स्पीडने हाय-स्पीड इंटरनेट सुविधा मिळते. या व्यतिरिक्त हा प्लॅन वापरकर्त्यांना 14 OTT Apps आणि 550 हून अधिक डिजिटल चॅनेलचे मोफत सब्स्क्रिप्शन ऑफर करतो करतो.
Jio AirFiber चे 899 आणि 1,199 रुपयांचे दोन इतर प्लॅन देखील समाविष्ट आहेत, ज्यामध्ये 100Mbps च्या वेगाने इंटरनेट ऍक्सेस उपलब्ध आहे. हे दोन्ही प्लॅन्स 14 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसह येतात, ज्यात Netflix, Amazon Prime आणि JioCinema Premium चे सब्स्क्रिप्शन सामील आहे. तसेच, हे प्लॅन्स देखील 550 हून अधिक डिजिटल चॅनेलचे ऍक्सेस देतात.
Jio AirFiber Max प्लॅनची सुरुवातीची किंमत 1,499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 300Mbps स्पीडने हाय-स्पीड इंटरनेट मिळेल. याशिवाय हा प्लॅन 14 पेक्षा जास्त OTT Apps ना मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो. यामध्ये 550 हून अधिक डिजिटल चॅनल्सचा सपोर्ट मिळेल.
यादीतील दुसऱ्या प्लॅनची किंमत 2,499 रुपये आहे, ज्यामध्ये 500Mbps इंटरनेट स्पीड उपलब्ध आहे. OTT आणि चॅनेलचे फायदे इतर वरील प्लॅन्ससारखेच आहेत.
Max च्या हाय-एंड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 3,999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 1000Mbps हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध आहे. OTT आणि चॅनेलचे फायदे इतर वरील प्लॅन्ससारखेच आहेत.