Jio ने AirFiber वापरकर्त्यांसाठी दोन नवीन बूस्टर प्लॅन लाँच केले आहेत. या पॅकद्वारे युजर्सना 500GB पर्यंत डेटा दिला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, टेलिकॉम दिग्गज Jio ने Airtel Xstreme AirFiber ला टक्कर देण्यासाठी गेल्या वर्षी म्हणेजच सप्टेंबर 2023 मध्ये Jio AirFiber सेवा सादर केली होती. या सेवेअंतर्गत प्लॅटफॉर्मवर टीव्ही, DTH आणि इतर ब्रॉडबँड सेवा पुरवल्या जातात. चला तर मग बघुयात नव्या बूस्टर प्लॅन्सची सविस्तर माहिती-
Jio ने दोन नवीन बूस्टर पॅक लाँच केले आहेत, ज्यांची किमंत 101 आणि 251 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे दोन्ही प्लॅन्स अनुक्रमे 100GB आणि 500GB डेटा प्रदान करतात. हे बूस्टर पॅक वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरतील, असा विश्वास कंपनीला आहे. यामध्ये यूजर्सना 5G हाय-स्पीड डेटा मिळेल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, 101 आणि 251 रुपयांच्या प्लॅन व्यतिरिक्त कंपनीकडे 401 रुपयांचा डेटा बूस्टर पॅक देखील उपलब्ध आहे. या रिचार्ज पॅकमध्ये 1TB हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. जरी वापरकर्त्यांनी त्यांचा डेटा वेळेपूर्वी संपवला, तरीही त्यांना डेटा जरा कमी स्पीडसह मिळत राहील. हे सर्व बूस्टर प्लॅन्स अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपवरून रिचार्ज केले जाऊ शकतात.
वर सांगितल्याप्रमाणे, Jio AirFiber सर्व्हिस सप्टेंबर 2023मध्ये लाँच करण्यात आली होती. त्यासोबतच, एक दोन नव्हे तर तब्बल सहा Jio AirFiber प्लॅन्स देखील लाँच करण्यात आले होते. हे प्लॅन्स अनुक्रमे 599 रुपये, 899 रुपये आणि 1,199 रुपये इ. आहेत. हे सर्व प्लॅन 6 महिने आणि 12 महिन्यांसाठी खरेदी केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये युजर्ससाठी 1000GB डेटा उपलब्ध आहे.