देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स JIO आपल्या 5G सेवांचा देशात झपाट्याने विस्तार करत आहे. पण कंपनी जबरदस्त बेनिफिट्ससह किफायतशीर प्लॅन्स देण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. जिओ आपले प्रीपेड पॅक बदलत राहते आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अल्पकालीन आणि दीर्घकालीन वैधतेसह प्लॅन्स ऑफर करत असते. चला तर मग JIO च्या अशाच एका खास प्लॅनबद्दल जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! Oppo Find N2 Flip अखेर भारतात लाँच, मिळतोय 10 हजार रुपयांचा डिस्काउंट
रिलायन्स JIO च्या लोकप्रिय प्लॅनमध्ये समाविष्ट असलेला हा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये कंपनी अमर्यादित कॉलिंग, दैनिक डेटा आणि इतर अनेक फायदे देतो. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळतो. म्हणजेच, प्लॅनच्या वैधतेपर्यंत ग्राहकांना संपूर्ण 225GB डेटाचा लाभ दिला जातो. My Jio App किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हा प्लॅन 899 रुपयांमध्ये सक्रिय केला जाऊ शकतो.
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला दररोज 100 SMS मोफत मिळतात. या व्यतिरिक्त तुम्हाला या प्लॅनसह इतर काही फायदे दिले जातात. हा प्लॅन तुम्हाला JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud सारख्या ऍप्सचे सबस्क्रिप्शन देखील देतो. तुम्ही JioTV वर अनेक प्रकारचे टीव्ही कार्यक्रम पाहू शकता. प्लॅन तुम्हाला JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील देते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.
JioSecurity ऍप तुमच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करते, जे आजकाल डिजिटल फसवणुकीमुळे खूप महत्वाचे झाले आहे. याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये JioCloud सेवा मिळते, जी कमी अंतर्गत स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनमध्ये खूप उपयुक्त आहे.
हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी अधिक फायदेशीर आहे, ज्यांना दैनंदिन डेटामध्ये अधिक लाभांसह दीर्घ वैधता प्लॅन हवी आहे. प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याचे तपशील देखील तपासून घ्या.