Jio कडे वर्सभराच्या वैधतेसह अनेक प्लॅन्स ऑफर केले जातात. आता वर्षभराच्या वैधतेसह प्लॅन्स म्हटले की, हे प्लॅन्स हजार रुपयांपेक्षा जास्त असतात, अशीच आपण कल्पना करतो. मात्र, कंपनीकडून 895 रुपयांचा एक विशेष प्रकारचा वार्षिक प्लॅन ऑफर केला जातो. ज्यामध्ये यूजर्स वर्षभर मोफत कॉलिंग, इंटरनेट आणि इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतील. मात्र लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त JIO फोन वापरकर्त्यांसाठी आहे. बघुयात बेनिफिट्स-
या प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे. कंपन्या एका महिन्याची वैधता 28 दिवसांची देतात. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा दिला जातो. म्हणजेच युजर्सना महिन्याला 2GB डेटा वापरता येणार आहे. तुम्ही वर्षभर मोफत अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.
तसेच, 28 दिवसांच्या सायकलनुसार 50 SMS दिले जातात. अशा 12 SMS प्लॅन वर्षभरात ऑफर केले जातील. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सना Jio TV आणि Jio Cinema चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.
वरील प्लॅन त्या युजर्ससाठी आहे, ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता नाही. दुसरीकडे, ज्या युजर्सच्या घरी Wi-Fi ची सुविधा आहे आणि फक्त कॉलिंगचा लाभ हवा, त्या युजर्ससाठी हे प्लॅन उत्तम आहे. अधिक माहितीसाठी JIO च्या अधिकृत साईटला भेट द्या.
Jio फोन वापरकर्त्यांसाठी 28 आणि 23 दिवस वैधता प्लॅन्स देखील आहेत. ज्यांची किंमत 75 रुपये ते 223 रुपये आहे. हे प्लॅन जी वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार Jio वेबसाइटवरून रिचार्ज करू शकतात.