प्रीपेड टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवण्यात आल्या असल्या तरी, वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्यांकडे प्रीपेड रिचार्जची मोठी श्रेणी आहे. भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये स्वस्त रिचार्जच्या बाबतीत, JIO सतत AIRTEL आणि VI ला मागे टाकत आहे. अशा परिस्थितीत, जर 84 दिवसांच्या वैधतेसह प्लॅनचा विचार केला तर, Jio कमी किंमतीत Airtel आणि Vi पेक्षा चांगल्या सोयीसह प्लॅन ऑफर करतो. कमी किमतीत अधिक डेटासह JIO च्या प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेऊया…
हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा आणि 8GB RAMसह Redmi चा सर्वात स्वस्त 5G फोन लाँच, किंमत केवळ ₹ 13,999
JIO च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 666 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा मिळतो. तसेच, या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय प्लॅनमध्ये 100 SMS ची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 126 GB पर्यंत डेटा दिला जातो. दैनंदिन 1.5 GB हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो. या प्लॅनसह, तुम्हाला Jio ऍप्सचे सर्व मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळतात.
AIRTEL मध्ये 1.5 GB इंटरनेट डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेसाठी तुम्हाला 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1.5 GB इंटरनेट डेटा आणि 84 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते. यासोबतच दररोज 100 SMS ही मिळतात. मात्र, या प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि फ्री हॅलोट्यूनचा मोफत प्रवेश देखील येतो. तसेच, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.
JIO च्या तुलनेत ही सुविधा VIच्या 719 रुपयांच्या रिचार्जमध्ये उपलब्ध आहे. Vi च्या 719 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये तुम्हाला 1.5 GB इंटरनेट डेटा आणि 84 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते. याशिवाय तुम्हाला दररोज 100 SMS देखील मिळतात. Vi सह तुम्हाला नाईट डेटाचा फायदा मिळतो, म्हणजेच यामध्ये तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोफत अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो.