भारतातील आघाडी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio आपल्या प्लॅन्समध्ये बेस्ट बेनिफिट्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. Jio च्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड इ. प्लॅन्स उपलब्ध आहेत. या सर्व प्लॅन्समध्ये हायस्पीड डेटा आणि कॉलिंगसह अनेक अप्रतिम फायदे दिले जातात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सर्व बेनिफिट्ससह Jio च्या प्रीमियम ऍप आणि दोन लोकप्रिय OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन मोफत आहे. जाणून घेउयात किंमत-
कथित प्लॅन Jio चा 749 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी 100GB डेटा दिला जात आहे. याशिवाय, पोस्टपेड प्लॅनमध्ये इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी अमर्यादित कॉलिंग दिले जाईल. तुम्हाला दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळेल. लक्षात घ्या की, जर वापरकर्त्यांनी डेटा मर्यादा ओलांडली तर त्यांना प्रति GB 10 रुपये द्यावे लागतील.
विशेष म्हणजे या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील फक्त 3 सदस्यांना ऍड करू शकता. यामध्ये सामील होणाऱ्या सदस्यांना दर महिन्याला अतिरिक्त 5GB डेटा मिळणार आहे. एवढेच नाही तर, या पोस्टपेड प्लॅनमध्ये लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix आणि Amazon Prime Lite चे सबस्क्रिप्शन देखील पूर्णपणे मोफत दिले जाईल. त्याबरोबरच, Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे ऍक्सेस देखील यात उपलब्ध आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा पोस्टपेड प्लॅन ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, कंपनीच्या स्टोअरला भेट देऊन देखील तुम्ही हे प्लॅन खरेदी करू शकता. त्याबरोबरच, नुकतेच Jio स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रीडम ऑफर आणली होती. ही ऑफर घेणाऱ्या यूजर्सना एकदा 2,121 रुपये भरावे लागतील. यानंतर त्यांना ब्रॉडबँड कनेक्शनसाठी इन्स्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाही.