Jio चा ‘हा’ जबरदस्त प्लॅन झालाय स्वस्त, 90 दिवसांच्या वैधतेसह मिळणार 180GB डेटा

Updated on 14-Sep-2022
HIGHLIGHTS

Jio ने आपला 750 रुपयांचा प्लॅन स्वस्त

प्लॅनची किंमत 749 रुपये होऊन मिळणाऱ्या फायद्यांमध्ये फार मोठे बदल नाही

प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा फ्री मिळणार आहे

रिलायन्स  Jioने 750 रुपयांचा प्लॅन स्वस्त केला आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये हा प्लॅन लाँच केला होता. आता या प्लॅनची किंमत 749 रुपये झाली आहे. ही खूप मोठी कपात नसली, तरी 1 रुपयांची किमतीत कपात करूनही  प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट तुमच्यासाठी उत्तम आहेत. मात्र, आता यामध्ये यूजर्सना 100 MB फ्री अतिरिक्त डेटा मिळणार नाही, जो कंपनी 750 रुपयांमध्ये देत होती. जाणून घेऊयात, या प्लॅनमध्ये कंपनी आता कोणते फायदे देणार… 

हे सुद्धा वाचा : Flipkart Big Billion Days Sale ची तारीख जाहीर, फोन-TV-लॅपटॉपवर 80% पर्यंत सूट

JIO चा 749 रुपयांचा प्लॅन

JIO चा हा प्लॅन 90 दिवस चालतो. प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी कंपनी दररोज 2 GB नुसार एकूण 180 GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS देखील मिळतील. Jio चा हा प्लॅन वापरकर्त्यांना Jio TV आणि Jio Cinema सारख्या Jio ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो. 

JIO च्या 'या' प्लॅनमध्ये देखील मिळतो दररोज 2 GB डेटा

JIO आपल्या यूजर्सला 719, 533, 299 आणि 249 रुपयांचे प्लॅन 749 रुपयांपेक्षा कमी देत ​​आहे. या सर्व प्लॅनमध्ये  तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळेल. सर्व प्लॅन मोफत कॉलिंग बेनिफिट आणि 100 SMS/ दररोज येतात. प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या वैधतेमध्ये बदल आहेत.

जिओचा 719 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याच वेळी, कंपनी 533 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता देत आहे. 299 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर तो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. जर तुम्ही 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये रिचार्ज केले तर तुम्हाला 23 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा आणि फ्री कॉलिंग मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :