digit zero1 awards

झटपट रिचार्ज करा ! Jio च्या 719 रुपयांच्या प्लॅनवर 150 रुपयांपर्यंत सूट, मिळेल दीर्घकाळ वैधता

झटपट रिचार्ज करा ! Jio च्या 719 रुपयांच्या प्लॅनवर 150 रुपयांपर्यंत सूट, मिळेल दीर्घकाळ वैधता
HIGHLIGHTS

jio ची आकर्षक आणि पैसावसूल ऑफर

719 रुपयांच्या प्लॅनवर सूट

मिळेल तब्बल 150 रुपयांपर्यंत सूट

Airtel, Jio, Vi, BSNL कडे असे अनेक प्लॅन्स आहेत, जे अधिक वैधता प्रदान करतात. सध्या JIO 719 रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे, ज्याची वैधता 84 दिवस आहे. आता तुम्हाला वाटत असेल की त्याची किंमत खूप जास्त आहे पण तुम्ही त्यावर 150 रुपयांपर्यंतची सूट सहज मिळवू शकता. कसे? कसे ते बघुयात… 

हे सुद्धा वाचा : 40 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतोय Google Pixel 6, पण खरेदी करणे पडेल का महागात ?

जिओचा  719  रुपयांचा प्लॅन :

 या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता दिली जाते. यासोबतच दररोज 2 GB डेटा दिला जाणार आहे. संपूर्ण वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 168 GB डेटा प्रदान केला जाईल. यासोबतच, यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि  दररोज 100 SMS दिले जातील. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे सबस्क्रिप्शन दिले जाईल. यामध्ये पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटादेखील दिला जाईल. 

मिळेल 150 रुपयांपर्यंत सूट

तुम्ही Jio ऍप साईटवरून या प्लॅनचा रिचार्ज केल्यास आणि खाली दिलेल्या स्क्रीनशॉटपैकी एकावरून पैसे भरल्यास, तुम्हाला 150 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तुम्हाला पूर्ण सवलत मिळाल्यास तुम्ही हा प्लॅन फक्त 569 रुपयांमध्ये रिचार्ज करता येईल. अशाप्रकारे तुम्हाला 569 रुपयांमध्ये दररोज 2 GB डेटासह 84 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo